JOIN US
मराठी बातम्या / मनी / नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार 3 गिफ्ट, वाढेल भत्ता!

नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार 3 गिफ्ट, वाढेल भत्ता!

यावर्षी 2023 मध्ये एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेंशनधारकांना तीन भेटवस्तू मिळू शकतात.

जाहिरात

7th Pay Commission

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 जानेवारी: नवीन वर्ष 2023 पासून सामान्य लोकांना तसेच केंद्रीय कर्मचारी आणि पेंशनधारकांना मोठ्या आशा आहेत. या वर्षी 2023 मध्ये, केंद्रीय कर्मचारी आणि पेंशन धारकांना एकाच वेळी तीन गिफ्ट मिळण्याची अपेक्षा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामध्ये कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये वाढ, फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ आणि थकबाकी डीएचा समावेश आहे. त्यातच महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या घोषणेचे काउंट डाउन देखील सुरु झाले आहे.

डीए तीन टक्क्यांपर्यंत वाढू शकतो

ज्या प्रकारे महागाईचा आलेख वाढत आहे, त्यावरून नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA Hike) 3 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असे दिसते. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा दर 6 महिन्यांनी आढावा घेतला जातो. AICPI आकडेवारीच्या आधारे महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो. एक वाढ जानेवारीत आणि दुसरी जुलैमध्ये होते. दरवर्षीप्रमाणे 2023 मध्येही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. Bank Strike : पुढील आठवड्यात दोन दिवस बँकांचा संप! जाणून घ्या तारखा   जानेवारी 2023 साठी महागाई भत्ता (DA) सहसा होळीपूर्वी जाहीर केला जातो. महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा खर्च सध्याच्या 38 टक्क्यांवरून 42 टक्क्यांवर येईल. सप्टेंबर 2022 मध्ये डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ केल्यानंतर आता केंद्रीय कर्मचारी नवीन वर्षात महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहत आहेत.

18 महिन्यांच्या DA थकबाकीबाबत सरकार मोठा निर्णय घेऊ शकते

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्यांच्या डीए थकबाकीचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. 2023 च्या सुरुवातीला सरकार मधला मार्ग काढून त्यावर तोडगा काढेल अशी अपेक्षा आहे. खरं तर, कोरोनाच्या काळात जानेवारी 2020 ते जून 2021 या शेवटच्या 18 महिन्यांचा DA अद्याप बाकी आहे. कर्मचारी संघटनांच्या मागण्या पाहता सरकार याबाबत मध्यममार्ग अवलंबून एकरकमी रक्कम जाहीर करू शकते. असे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या खात्यात 2.18 लाख रुपये येऊ शकतात. आधार कार्डवरील फोटो चेंज करायचाय? जाणून घ्या सोपी प्रोसेस  

फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ

केंद्र सरकारच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा करण्याच्या चर्चाही सुरु आहेत. फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी केंद्रीय कर्मचारी सातत्याने करत आहेत. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सरकार फिटमेंट फॅक्टरमध्ये रिव्हिजन वाढवण्याबाबत मोठी घोषणा करू शकते. फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57 टक्के दराने फिटमेंट फॅक्टर दिला जात आहे. त्यात 3.68 पट वाढ करण्याची मागणी होत आहे. फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.68 पर्यंत वाढल्याने, किमान मूळ वेतन 18,000 वरून 26,000 रुपये होईल. केंद्र सरकारने ही मागणी मान्य केल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात प्रचंड वाढ होणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या वेळी 2016 मध्ये फिटमेंट फॅक्टर वाढवण्यात आला होता. त्याच वर्षी सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे किमान पगार थेट 6000 रुपयांवरून 18,000 रुपयांवर गेले होते. तर कमाल मर्यादा 90,000 रुपयांवरून 2.5 लाख रुपये करण्यात आली. आता सरकार या वर्षी पुन्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या