JOIN US
मराठी बातम्या / मनी / LIC IPO मध्ये फॉरेन इन्वेस्टर्सच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा, 20 टक्के FDI ला केंद्राची मंजुरी

LIC IPO मध्ये फॉरेन इन्वेस्टर्सच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा, 20 टक्के FDI ला केंद्राची मंजुरी

LIC चा IPO हा देशातील सर्वात मोठा IPO असेल. लिस्टिंगनंतर एलआयसी देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत सामील होईल. RIL आणि TCS यापेक्षा या दोनच कंपन्याची मार्केट कॅप मोठ्या असतील.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 फेब्रुवारी : एलआयसीमध्ये (LIC IPO) एफडीआयचा (Foreign direct investment) मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली आहे. शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. Moneycontrol.com ने शनिवारी सकाळी वृत्त दिले होते की LIC मध्ये FDI ला परवानगी देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ मंजुरी देऊ शकते. सूत्रांनी सांगितले की, आता ऑटोमॅटिक रुटने LIC मध्ये 20 टक्क्यांपर्यंत थेट विदेशी गुंतवणुकीला (FDI) परवानगी दिली जाईल. एफडीआयच्या सध्याच्या धोरणातही बदल करण्यात आले आहेत. एफडीआयला मंजुरी मिळाल्याने परदेशी फंड देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवू शकतील. सध्याच्या FDI धोरणानुसार, विमा क्षेत्रात रशियाकडून 74 टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी आहे. परंतु, हा नियम एलआयसीला लागू होत नाही. याचे कारण म्हणजे एलआयसीसाठी सरकारचा एक वेगळा कायदा आहे, ज्याला एलआयसी कायदा म्हणतात. आता त्यात बदल करण्याच्या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिली आहे. LIC IPO : एलआयसीचे शेअर स्वस्तात हवेत? 28 फेब्रुवारी आधी ‘हे’ काम करा सेबीच्या नियमांनुसार, पब्लिक ऑफर अंतर्गत फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट (FPI) आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला परवानगी आहे. परंतु एलआयसी कायद्यात परकीय गुंतवणुकीची तरतूद नसल्यामुळे, परदेशी फंड त्याच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत. मंत्रिमंडळाने एफडीआय धोरणात बदल केल्यानंतर आता परदेशी फंड एलआयसीच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवू शकणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये FDI ची मर्यादा 20 टक्के आहे. त्यामुळे एलआयसीसाठीही 20 टक्के मर्यादा ठेवण्यात आली आहे. एफडीआयच्या परवानगीने परदेशी गुंतवणूकदार एलआयसीच्या आयपीओमध्ये चांगला रस दाखवू शकतात, असे सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षी जुलैमध्ये मंत्रिमंडळाने एलआयसीच्या आयपीओच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. आता या आयपीओची तयारी पूर्ण झाली आहे. मार्चमध्ये हा आयपीओ बाजारात येईल, अशी अपेक्षा आहे. या इश्यूमधून सरकार 60 ते 90 हजार कोटी रुपये उभे करू शकते. PNB Payment Rules: पीएनबी ग्राहकांसाठी एप्रिलपासून बदलणार पेमेंटचे नियम, चेक करा डिटेल्स LIC चा IPO हा देशातील सर्वात मोठा IPO असेल. लिस्टिंगनंतर एलआयसी देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत सामील होईल. RIL आणि TCS यापेक्षा या दोनच कंपन्याची मार्केट कॅप मोठ्या असतील. LIC ने IPO मध्ये आपल्या पॉलिसीधारकांसाठी शेअर्स राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी सुमारे 10 टक्के शेअर्स पॉलिसीधारकांसाठी राखून ठेवू शकते. कंपनी त्यांना शेअरच्या किमतीत सूटही देऊ शकते. एलआयसीचे जवळपास 29 कोटी पॉलिसीधारक आहेत. त्याचे देशभरात सुमारे 12 लाख एजंट आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या