JOIN US
मराठी बातम्या / मनी / Business Idea: एक अंड 50 रुपयांचं, सामान्य चिकनपेक्षा चारपट महाग मिळतं 'कडकनाथ'; पाहा कसं करावं पालन

Business Idea: एक अंड 50 रुपयांचं, सामान्य चिकनपेक्षा चारपट महाग मिळतं 'कडकनाथ'; पाहा कसं करावं पालन

कोंबड्याची कडकनाथ प्रजाती ही जास्त सर्वश्रेष्ठ मानली जाते. सामान्य कोंबड्याच्या तुलनेत याची चव आणि प्रोटीक इंटेक दोन्हीही अनेक पटींनी जास्त आहे. यामुळे बाजारात याची मागणी वाढली आहे.

जाहिरात

कडकनाथ कोंबड्यांचं पालन कसं करावं?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Business Idea: देश आणि जगात चिकनचा शौक असलेले अनेक लोक आहेत. भारतात नेहमीच लोक पोल्ट्री फॉर्मच्या चिकन ऐवजी देशी कोंबडा खरेदी करणं पसंत करतात. हा महाग असतो, पण तुम्हाला कोंबड्याच्या सर्वात महागड्या जातीविषयी माहिती आहे का? कोंबडीच्या प्रजातींमध्ये कडकनाथ कोंबडा सर्वोत्तम मानला जातो. जो प्रामुख्याने मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात आढळतो. मात्र, आता त्याची निर्मिती देशाच्या इतर भागातही होऊ लागली आहे. कुक्कुटपालनामध्ये कडकनाथ कोंबडीचे पालन करून शेतकरी भरपूर पैसे कमवू शकतात. खरं तर, हा कोंबडा अनेक अर्थांनी खास आहे, म्हणूनच त्याच्या मांसाची किंमत जास्त असते.

बाजारात झपाट्याने वाढतेय मागणी कडकनाथ कोंबडी पूर्णपणे काळ्या रंगाची असून या कोंबडीचे रक्त, मांस आणि अंडी देखील काळ्या रंगाची आहेत. कडकनाथची चव आणि प्रोटीन सामान्य चिकनपेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याने त्याच्या मांसाला बाजारात मागणी वाढतेय. Business Idea:‘हा’ बिझनेस करुन होता येईल मालमाल! औषधींपासून सौंदर्य प्रसाधानासाठी आहे उपयोगी कडकनाथ मुख्यतः मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात आढळतो. मात्र वैज्ञानिक संशोधनाच्या मदतीने छत्तीसगड, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातही त्याचे पालन केले जात आहे. कडकनाथ कोंबडीच्या तीन प्रजाती जेड ब्लॅक कॉक, पेन्सिल आणि गोल्डन ब्लॅक आहेत. 150 चौरस फूटांच्या जागेत सुरु करा पोल्ट्री फार्म तुम्हाला कडकनाथ कोंबडीचे पालनपोषण करून पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला किमान 150 स्क्वेअर फूट जागेची आवश्यकता असेल. या ठिकाणी तुम्ही 100 कोंबडी पाळू शकता. यासाठी शेड बनवा आणि एकाच शेडमध्ये दोन वेगवेगळ्या जाती ठेवू नका हे लक्षात ठेवा. Business Idea: फक्त 5 हजारात सुरु करा हा सुपरहिट बिझनेस, होईल भरपूर कमाई! 800-1000 रुपये प्रति किलो ही कोंबडी 4 ते 5 महिन्यांत पूर्णपणे तयार होते आणि कडकनाथ कोंबडीचे मांस 800 ते 1000 रुपये किलो दराने बाजारात विकले जाते. एवढेच नाही तर त्याच्या अंड्याची किंमतही 50 रुपयांपर्यंत जाते. यामुळे तुमची चांगली कमाई होऊ शकते. कडकनाथ कोंबड्यामध्ये देशी कोंबड्याच्या तुलनेत 25 टक्क्यांपेक्षा जास्त प्रोटीन आढळतं. तसंच इतर कोंबड्यांमध्ये 15 ते 25 टक्के फॅट असतं. मात्र यामध्ये आयरन जास्त असतं. याचं मास आजारी लोकांसाठी फायदेशीर मानलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या