JOIN US
मराठी बातम्या / मनी / पूर्वीपेक्षा घर बांधणं महागलं! वाचा काय आहे महागाई वाढण्याचं कारण

पूर्वीपेक्षा घर बांधणं महागलं! वाचा काय आहे महागाई वाढण्याचं कारण

बांधकाम क्षेत्रात कमीतकमी मजुरीमध्ये 15 ते 20 टक्के वाढ झाली आहे. या क्षेत्रात जवळपास 5 कोटी लोकं काम करतात. पँडेमिक आधीच्या तुलनेतर या मजुरांची मजुरी 450-500 रुपयांवरून वाढून 550-600 रुपये प्रति दिन झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 19 डिसेंबर: कोरोना पँडेमिक (Coronavirus Pandemic) आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) बांधकाम क्षेत्रात (Construction Sector) महागाई वाढली आहे. आता घर बांधणे पूर्वीपेक्षा अधिक महाग झाले आहे. जर तुम्ही आता घर बांधण्याचा विचार करत असाल तर तुम्ही थोडावेळ वाट पाहणं योग्य ठरेल. कोरोनामुळे मजुरांची कमतरता असल्याने रोजंदारीत मजुरी देखील वाढली आहे. त्यामुळे जर तुम्ही आता घर बांधत असाल तर पूर्वीपेक्षा जास्त मजुरी द्यावी लागू शकते. एवढ्या टक्क्यांनी वाढली मजुरी बांधकाम क्षेत्रातील किमान वेतनात 15-20% वाढ झाली आहे. या क्षेत्रात सुमारे 5 कोटी लोक काम करतात. मानव संसाधन व्यवस्थापन कंपनी बेटरप्लेसच्या अंदाजानुसार, पँडेमिक आधीच्या तुलनेत ही मजुरी 450-500 रुपयांवरून 550-600 रुपये प्रतिदिन झाली आहे. त्याच वेळी, मजुरांची उपलब्धता 70-75 टक्क्यांनी कमी झाली आहे. (हे वाचा-LIC Money Back Plan: रोज 160 रुपयांची बचत करून व्हा 23 लाख रुपयांचे मालक) कमी कामगार ही मोठी समस्या कोरोना पँडेमिक काळात बहुतेक मजुर आणि कामगार त्यांच्या घरी परतले आहेत. त्याचवेळी उर्वरित कामगार जे शहरात आहेत, त्यापैकी बहुतेक लोक रिअल इस्टेट कंपनी आणि हायवेच्या बांधकामात गुंतले आहेत. कारण या ठिकाणी मजुरांना दीर्घकाळासाठी काम मिळतं. अशा परिस्थितीत मजुरांच्या कमतरतेमुळे किमान वेतनामध्ये वाढ झाली आहे. (हे वाचा-मोठी घडामोड! RBIने या बँकेवरील निर्बंध 31 मार्चपर्यंत वाढवले) बांधकाम क्षेत्रात जास्तीत जास्त रोजगार रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना बांधकाम क्षेत्रात जास्तीत जास्त रोजगार मिळतो. कारण हे क्षेत्र पूर्णपणे असंघटित आहे. याठिकाणी कंत्राट पद्धत प्रचलित आहे. यामुळे मोठ्या संख्येने कंत्राटदार देखील याच क्षेत्रात मजूर पाठवतात. बेटरप्लेसचे सीईओ सौरभ टंडन यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउननंतर कामगारांच्या कमतरतेमुळे वेतन वाढले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या