JOIN US
मराठी बातम्या / मनी / दररोज फक्त 70 रुपये गुंतवून काही वर्षांतच बना लखपती; पोस्ट ऑफिसची खास बचत योजना

दररोज फक्त 70 रुपये गुंतवून काही वर्षांतच बना लखपती; पोस्ट ऑफिसची खास बचत योजना

पीपीएफ योजनेत चक्रवाढ पद्धतीनं व्याज (Compound Interest) मिळतं. म्हणजेच मुद्दलाच्या रकमेवर मिळणारं व्याजही मुद्दलात जमा करून त्यावर व्याज दिलं जातं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 06 सप्टेंबर : सर्वसामान्य माणूस आयुष्यभर आपल्याला मिळत असलेल्या उत्पन्नातून बचत (Savings) करून आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी तसंच महत्त्वाच्या खर्चासाठी तरतूद करत असतो. आपला कष्टाचा पैसा सुरक्षित राहणं त्याच्यासाठी जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे बहुतांश लोक चांगला परतावा देणाऱ्या आणि सुरक्षित अशा पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना (Post Office Savings Scheme) प्राधान्य देतात. सरकारची हमी असल्यानं यात पैसे बुडण्याची शक्यता नसते. सरकारच्या विविध योजनांमधील सार्वजनिक भविष्य निधी अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ (PPF) ही एक अतिशय लोकप्रिय योजना आहे. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातूनही या योजनेत पैसे गुंतवता येतात. या योजनेत तुम्ही दररोज 70 रुपये याप्रमाणे दरमहा 2 हजार रुपये गुंतवून 15 वर्षांत लखपती बनू शकता. चक्रवाढ व्याजाचा लाभ पीपीएफ योजनेत चक्रवाढ पद्धतीनं व्याज (Compound Interest) मिळतं. म्हणजेच मुद्दलाच्या रकमेवर मिळणारं व्याजही मुद्दलात जमा करून त्यावर व्याज दिलं जातं. थोडक्यात व्याजावर व्याज मिळतं. यामुळे या योजनेत परतावा अधिक चांगला मिळतो. गेल्या काही वर्षांपासून पोस्ट ऑफिस योजनांच्या व्याजदराचा प्रत्येक तिमाहीत आढावा घेऊन व्याजदर बदलले जातात. मात्र गेल्या अनेक तिमाहींपासून पोस्ट ऑफिस योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. 1 एप्रिल 2020 पासून पीपीएफ योजनेत 7.1 टक्के दराने व्याज दिलं जात आहे. तुमचाही TDS कापला गेलाय का? तपासून बघण्याची सगळ्यात सोपी पद्धत तुम्ही दरमहा 1 हजार याप्रमाणे वर्षाला 12 हजार रुपये दरमहा जमा केले तर 15 वर्षे मुदतीच्या या योजनेत तुम्ही एकूण 1 लाख 80 हजार रुपये गुंतवाल. यावर तुम्हाला 1 लाख 35 हजार 567 रुपये व्याज मिळेल. मुदत संपल्यानंतर तुम्हाला तब्बल 3 लाख 15 हजार 567 रुपये इतकी रक्कम मिळेल. यासाठी तुम्हाला फक्त दररोज 35 ते 40 रुपये वाचवावे लागतील. तुम्ही दररोज 70 रुपये वाचवून महिन्याला 2 हजार रुपये याप्रमाणे वर्षाला 24 हजार रुपये गुंतवले तर या योजनेत एकूण 3 लाख 36 हजार रुपये गुंतवाल. यावर व्याज म्हणून 2 लाख 71 हजार 135 रुपये मिळतील. मुदतपूर्तीनंतर तुम्हाला एकूण 6 लाख 31 हजार 135 रुपये मिळतील. दिलासादायक बातमी, बाजारातलं चित्र बदलणार, कंपन्या नोकऱ्यांची दारं उघडणार! मुदत संपण्यापूर्वी खातं बंद करता येतं कोणत्याही कारणामुळे तुम्हाला 15 वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच पैशांची गरज भासली, तर तुम्ही मुदतीपूर्वी (Pre Mature) पीपीएफ खात्यातून पैसे काढू शकता. वैद्यकीय कारणासाठी (Medical Reason) पूर्ण रक्कम काढता येते. खातेदार स्वत: किंवा कुटुंबातील कोणीही सदस्य गंभीर आजाराने ग्रस्त असेल तर या खात्यातून पैसे काढण्याची परवानगी आहे. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी (Higher Education of Child) पैशांची गरज असल्यास तुम्ही पीपीएफ खाते मुदतीपूर्वी बंद करू शकता. खातेदाराच्या मृत्यूनंतर नामनिर्देशित व्यक्ती या खात्यातून सर्व पैसे काढू शकतो. पीपीएफ खातं कोण उघडू शकतं? कोणीही भारतीय नागरिक (Indian Citizen) पीपीएफ खाते उघडू शकतो. अल्पवयीन व्यक्तीच्या नावानेही खातं उघडता येतं. किमान 500 रुपयांनी पीपीएफ खाते उघडता येतं. पोस्ट ऑफिस व्यतिरिक्त, बँकांच्या शाखांमध्येदेखील पीपीएफ खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे. या खात्यात तुम्हाला दर वर्षाला किमान 500 रुपये आणि कमाल दीड लाख रुपये गुंतवता येतात आणि यावर मिळणार व्याज करपात्र नसतं. त्यामुळे तुम्ही या योजनेत पैसे गुंतवण्याच विचार करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या