जाहिरात
मराठी बातम्या / मनी / तुमचाही TDS कापला गेलाय का? तपासून बघण्याची सगळ्यात सोपी पद्धत

तुमचाही TDS कापला गेलाय का? तपासून बघण्याची सगळ्यात सोपी पद्धत

तुमचाही TDS कापला गेलाय का? तपासून बघण्याची सगळ्यात सोपी पद्धत

प्रत्येक करदाता (Tax Payer) दरवर्षी जुलै महिनाअखेरीस प्राप्तिकर विवरण पत्र (Income Tax Return) भरण्याच्या गडबडीत असतो. सध्या कोरोना साथीच्या संकटामुळे ही मुदत वाढवण्यात आली आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 5 सप्टेंबर : प्रत्येक करदाता (Tax Payer) दरवर्षी जुलै महिनाअखेरीस प्राप्तिकर विवरण पत्र (Income Tax Return) भरण्याच्या गडबडीत असतो. सध्या कोरोना साथीच्या संकटामुळे ही मुदत वाढवण्यात आली आहे. आपल्या वार्षिक उत्पन्नावर ठराविक टक्के कर सरकारकडे जमा होतो. उत्पन्नानुसार कर कपातीचा दर निश्चित केलेला असतो. त्यानुसार तुमच्या उत्पन्नातून कर कपात केली जाते. तुमचं उत्पन्न कर मर्यादेत येत नसेल तर हा कर तुम्हाला परत मिळतो. मात्र यासाठी कर विवरण पत्र भरणं आवश्यक असतं. वेगवेगळ्या मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नावर कापल्या जाणाऱ्या या कराला टीडीएस (TDS) अर्थात टॅक्स डिडक्टेड अॅट सोर्सेस म्हणतात. तुमच्या पॅन कार्ड खात्यात (Pan Card account) हा कर जमा केला जातो. कंत्राटी कर्मचारी असाल तर तुमच्या पगारातून टीडीएस कापला जातो. याशिवाय मुदतठेवीवरील ठराविक मर्यादेनंतरचे व्याज, पोस्टातील ठेवी यावरही कर कपात होते. मात्र अनेकदा लोकांना आपला टीडीएस कापला जातो आहे की नाही याची माहिती नसते. तो किती कापला आहे याचीही माहिती नसते. मात्र आता ही माहिती मिळवणे अगदी सोपे झाले आहे. प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) याबाबत ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. तुमच्या पॅन कार्ड खात्यातून अगदी सहजपणे टीडीएस किती कापला गेला आहे हे समजू शकते. यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, प्राप्तिकर खात्याच्या www.incometax.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा. नंतर इथं लॉग इन करा. आधीच नोंदणी केली असेल तर तुम्हाला लॉग इन करता येईल, अन्यथा पॅन कार्डच्या आधारे नोंदणी करावी लागेल. यानंतर, तुम्हाला फॉर्म 26AS टॅक्स क्रेडिट या पर्यायावर क्लिक करावं लागेल. तुम्हाला View TaX हा पर्याय दिसेल. त्यानंतर वर्ष आणि फाइल प्रकार निवडावा लागेल. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमचा किती टीडीएस कापला गेला आहे ते दिसेल. या माहितीची पीडीएफ फाईलदेखील तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्ही गेल्या दोन वर्षात म्हणजे वर्ष 2019-20 आणि 2020-21साठी प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) दाखल केलं नसेल तर अधिक दराने टीडीएस (TDS) कापला जाईल. सरकारने विवरणपत्राबाबतचे नियम आता कठोर केले असून, विवरण पत्र वेळेत न भरल्यास जबर दंड आकारला जातो. त्यामुळे तुम्ही एका वर्षाचे विवरणपत्र भरले असेल तरी कलम 206CCA आणि 206AB यापैकी कोणतेही कलम लागू होणार नाही. टीडीएसही कमी कापला जाईल. विवरणपत्र दाखल केल्यानंतर प्राप्तिकर विभागाकडून त्याची छाननी केली जाईल आणि तुमचं उत्पन्न करपात्र नसल्यास कापली गेलेली टीडीएसची सर्व रक्कम तुम्ही दिलेल्या बँक खात्यात जमा होईल. तेव्हा तुमचा टीडीएस किती कापला गेला आहे, याची ऑनलाइन माहिती घ्या आणि विवरणपत्र भरून सर्व रक्कम परत मिळवा. वेळेत हे काम केल्यास तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात