JOIN US
मराठी बातम्या / मनी / ही बँक स्वस्तात विकत आहे प्रॉपर्टी, वाचा कशाप्रकारे खरेदी कराल स्वत:चं घर?

ही बँक स्वस्तात विकत आहे प्रॉपर्टी, वाचा कशाप्रकारे खरेदी कराल स्वत:चं घर?

Bank of Baroda Mega E Auction: बँक ऑफ बडोदा (BoB) काही मालमत्तांचा लिलाव करत आहे. हा ई-लिलाव आजपासून अर्थात 28 जुलैपासून सुरू होत आहे. या अशा प्रॉपर्टी आहेत ज्या डिफॉल्टच्या यादीमध्ये आल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 जुलै: जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. तुम्हाला बाजार भावापेक्षा कमी किंमतीत घर खरेदी करता येईल. बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्वस्तात घरखरेदीची संधी मिळेल. BoB कडून काही मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. हा ई-लिलाव आजपासून अर्थात 28 जुलैपासून सुरू होत आहे. या अशा प्रॉपर्टी आहेत ज्या डिफॉल्टच्या यादीमध्ये आल्या आहेत. याबाबत IBAPI (Indian Banks Auctions Mortgaged Properties Information) कडून माहिती देण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदाकडून रेसिडेंशियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, अ‍ॅग्रीकल्चर प्रॉपर्टी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. बँकेकडून आयोजित केला जातो लिलाव ज्या प्रापर्टीच्या मालकांनी त्या जागेचं कर्ज फेडलं नसेल किंवा एखाद्या कारणाने ते कर्ज देऊ शकत नसतील, त्या सर्वांची प्रापर्टी बँकेद्वारा जप्त केली जाते. बँकांकडून वेळोवेळी अशा प्रॉपर्टीचा लिलाव केला जातो. अशाप्रकारच्या लिलावात बँक अशा प्रापर्टी विकून आपली रक्कम वसूल करुन घेतात. हे वाचा- IRCTC देत आहे 1,00,000 रुपये जिंकण्याची संधी, तुम्हाला करावं लागेल हे एक काम BoB ने ट्वीट करून दिली माहिती बँक ऑफ बडोदाकडून त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की 28 जुलै 2021 रोजी होणाऱ्या मेगा ई-लिलावात (Mega E-Auction) सहभागी व्हा. यामध्ये निवासी आणि औद्योगिक प्रॉपर्टीचा लिलाव होणार आहे. तुम्ही योग्य किंमत लावून याठिकाणी मालमत्ता खरेदी करू शकता.

संबंधित बातम्या

कुठे कराल रजिस्ट्रेशन? बँक ऑफ बडोदाच्या मेगा ई-ऑक्शनमध्ये इच्छूक बिडरला e Bkray पोर्टल https://ibapi.in/ वर रजिस्ट्रेशन करावं लागेल. बिडरला आपल्या मोबाईल नंबर आणि Email ID चा वापर करुन E-Auction प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यानंतर बिडरला KYC डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. KYC डॉक्युमेंट E-Auction सर्विस प्रोवाइडर द्वारा व्हेरिफिकेशन केलं जाईल. यासाठी कमीत-कमी दोन वर्किंग डे इतका वेळ लागू शकतो. तुम्ही अधिक माहितीकरता https://ibapi.in/https://www.bankofbaroda.in/e auction.htm?utm_source=SM&utm_medium=Post&utm_campaign=MegaAuction_km या लिंकवर भेट देऊ शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या