JOIN US
मराठी बातम्या / मनी / बँकेची कामांचं आताच नियोजन करा, 14 दिवस बँक राहणार बंद

बँकेची कामांचं आताच नियोजन करा, 14 दिवस बँक राहणार बंद

बँकेची कोणतीही कामं असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची, किती दिवस कुठे बँक बंद आहेत पाहा लिस्ट

जाहिरात

bank-holiday

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुट्ट्यांचं कॅलेंडर जाहीर करत असते. त्यामुळे लोकांना त्यांच्या कामांचं नियोजन करता येतं. तर बँका देखील सुट्ट्यांबद्दल आपल्या ग्राहकांना माहिती देत असतात. ग्राहकांची कोणतीही कामं अडून राहू नयेत यासाठी त्यांनी लिस्ट चेक करणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही बँकेत जाणार आणि ती बंद असणार अशी वेळ तुमच्यावर येऊ नये. डिसेंबर महिन्यात 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये सरकारी आणि खासगी बँकांना 14 दिवसांची सुट्टी असणार आहे. यामध्ये शनिवार आणि रविवारचाही समावेश आहे. या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाइन व्यवहार करू शकता. इंटरनेट बँकिंग सेवा सुरू राहणार आहेत. 14 दिवस सुट्ट्या असल्याने कदाचित ATM मध्ये पैशांवरून त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जर पैसे हवे असतील तर तुम्ही सुट्टीच्या आधीच ते काढून ठेवा. बँकेच्या या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे दिवस असणार आहेत. अशी आहे बँकांची बँक हॉलिडे लिस्ट, हे पाहून तुमच्या शहरात कोणत्या दिवशी बँका बंद होणार आहेत हे कळू शकतं.

RBI कडून मुंबईतील बँकेवर मोठी कारवाई, तुमचं खातं आहे का?

सुट्टीच्या दिवशीही बँकांच्या ऑनलाइन सुविधा सुरू राहणार आहेत. याशिवाय एसएमएस, नेट बँकिंग, व्हॉट्सअॅप बँकिंग आणि कस्टमर केअर सर्व्हिस आदी सेवा सुरू राहणार आहेत. या काळात तुम्हाला बँकेत जायचं असेल तर सुट्ट्यांवरती एकदा तुम्ही नजर टाकायला हवी. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. यावेळी 10 आणि 24 डिसेंबरला सुट्टी असणार आहे. तर 4, 11, 18 आणि 25 या रविवारच्या सुट्ट्या असतील.

ऑनलाइन Recurring Deposit खातं कसं सुरू करायचं, पैसे कधी काढता येतात?

संबंधित बातम्या

3 डिसेंबरला- पणजीत बँका बंद राहणार सेंट फ्रान्सिस झेविअर्स फेस्टिव्हल 4 डिसेंबरला रविवार - साप्ताहिक सुट्टी 5 दिसंबर, गुजरात विधानसभा चुनाव 2022 - अहमदाबाद 10 डिसेंबर, दुसरा शनिवार - देशभरातील बँकांची सूट 11 डिसेंबर, रविवार - साप्ताहिक सुट्टी 12 डिसेंबर, पा-तोगन नेंगमिंजा संगमा - शिलाँग 18 डिसेंबर, रविवार - साप्ताहिक सुट्टी 19 दिसंबर, गोवा मुक्ति दिन- गोवा 24 डिसेंबर, नाताळ सण आणि चौथा शनिवार - देशभरात 25 डिसेंबर, रविवार - साप्ताहिक सुट्टी 26 डिसेंबर रोजी ख्रिसमस सेलिब्रेशन, लोसुंग, नामसंग यामुळे आयझॉल, गंगटोक, शिलाँगमध्ये बँका बंद राहतील. 29 दिसंबर, गुरु गोविंद सिंह जी की बर्थडे - चंदीगढ़ 30 दिसंबर, यू कियांग नांगबाह - शिलाँग 31 डिसेंबर रोजी नववर्षाच्या पूर्वसंध्येला आयझॉलमध्ये बँका बंद राहतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या