pnb bank account is close due to pending kyc updates know your account status
मुंबई: बँक खातं आपण वापरतोच. सध्या असा कोणी नाही ज्याला बँक खात्याची गरज भासत नाही. तुम्ही जर पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. बँकेत जर तुमच्या खात्याचं KYC पूर्ण झालं नसेल तर खातं बंद होणार आहे. गेल्या 11 दिवसात बँकेनं वारंवार ग्राहकांना याबाबत सूचना दिल्या होत्या. पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) ज्या ग्राहकांनी KYC केलं नाही त्यांचं खातं बंद करण्यात येणार आहे.त्यांच्या खात्यातून व्यवहार करण्यासाठी अडचणी येऊ शकतात. जे ग्राहक केवायसी अपडेट करणार नाहीत, त्यांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. असे पंजाब नॅशनल बँकेने स्पष्टपणे सांगितले आहे.
Credit Card: क्रेडिट कार्डची ड्यू डेट निघून गेली? पेनल्टीपासून वाचण्यासाठी काय करायचं?रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) नियमानुसार ग्राहकांनी 12 डिसेंबर 2022 पूर्वी केवायसी अपडेट करावं, असं पीएनबीने ग्राहकांना सांगितलं होतं. तुम्ही जर या नोटिसकडे दुर्लक्ष केलं असेल तर तुमचं नुकसान होणार आहे. ज्या ग्राहकांचे केवायसी अपडेशन प्रलंबित आहे, त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर दोन नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. याशिवाय ग्राहकांना बँकेकडून SMS देखील पाठवण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आहे. बँकेने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर याबाबत नोटिफिकेशनही शेअर केलं आहे.
PM Kisan Yojana: पुढील महिन्यात येऊ शकतो 13वा हप्ता, लाभ घेण्यासाठी त्वरित करा हे महत्त्वाचं कामआता जर तुमचे बँकेतून किंवा ऑनलाइन व्यवहार होत नसतील तर तुम्ही तातडीनं तुमच्या जवळच्या ब्रांचला जाऊन याबाबत माहिती द्या. तुमचं खातं बंद झालं असेल तर पुन्हा सुरू करण्यासाठी अर्ज करा. नाहीतर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वेळीच याबाबत तुमचं खातं बंद झालं नाही ना ते चेक करून योग्य तो निर्णय घ्या.