JOIN US
मराठी बातम्या / मनी / Bank Loan : दिवाळीआधी मोठा धक्का, या बँकेनं वाढवलं लोन; तुमचा EMI कितीने वाढणार पाहा

Bank Loan : दिवाळीआधी मोठा धक्का, या बँकेनं वाढवलं लोन; तुमचा EMI कितीने वाढणार पाहा

या बँकेनं वाढवलं लोनवरचं व्याजदर, तुमच्या EMI वर होणार थेट परिणाम

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : महागाई मोठ्या प्रमाणात वाढ आहे. तर दुसरीकडे RBI नं व्याजदर वाढवल्याने आता EMI देखील वाढले आहेत. सणासुदीच्या काळात नवीन वस्तू किंवा घर किंवा एखादी गाडी घ्यावी असं कुटुंबात ठरलेलं असतं. या मुहूर्तावर नवीन वस्तू घरात आणल्या जात आहेत. अॅक्सिस बँकेनं लोनवरील इंट्रेस्ट रेट वाढवला आहे. यासोबत आता तुमचा EMI देखील वाढणार आहे. बँकेनं Marginal Cost of Lending Rates आधारित व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. तर EMI वरही 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. बँकेनं आता EMI वाढवून लोन टॅन्यूअर देखील वाढवलं आहे. त्यामुळे ग्राहकांवर फायनांशियल लोड येणार नाही असं बँकेचं म्हणणं आहे. रिझर्व्ह बँकेने 30 सप्टेंबर रोजी सलग तिसऱ्यांदा रेपो दरात वाढ केली होती. यानंतर बँकांनी दरवाढ सुरू केली आहे. यंदा आरबीआयने रेपो रेट 4.00 टक्क्यांवरून 5.90 टक्के केला आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर रेपो दरात वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम बँकेच्या कर्जाच्या व्याजदरावर झाला आहे.

जन-धन योजनेतून बँकेत खातं असलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी

एमसीएलआरनुसार कर्जाचे व्याजदर बँक ठरवते. याबरोबरच बँकाही आपल्या एफडीचे दर आणि बचत खात्याचे दर सातत्याने वाढवत आहेत. आणखी दोन खासगी बँकांची कर्जे महागली आहेत. कोटक महिंद्रा बँक आणि फेडरल बँक या खासगी क्षेत्रातील बँकांनी आपल्या एमसीएलआरमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कोटक महिंद्रा बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठी आपल्या एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे. बँक एका रात्रीपासून 3 वर्षांसाठी 7.70 टक्के ते 8.95 टक्क्यांपर्यंत एमसीएलआर ऑफर करत आहे. हे नवे दर 16 ऑक्टोबर 2022 पासून लागू झाले आहेत.

खुशखबर! दिवाळीआधी शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

संबंधित बातम्या

त्याचबरोबर कोटक महिंद्रा बँकेचा रातोरात एमसीएलआर दर 7.70 टक्के आहे. 1 महिन्याचा एमसीएलआर 7.95%, 3 महिन्यांचा एमसीएलआर 8.05%, 6 महिन्यांचा एमसीएलआर 8.30%, 1 वर्षाचा एमसीएलआर 8.45%, 2 वर्षांचा एमसीएलआर 8.75% आणि 3 वर्षांचा एमसीएलआर 8.95% आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या