नवी दिल्ली, 21 सप्टेंबर: तुम्ही जर ओरिएंटल बँक (Oriental bank -OBC), अलाहाबाद बँक (Allahabad Bank) आणि यूनाइटेड बँक ऑफ इंडिया (United Bank of India - UBI) चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 1 ऑक्टोबरपासून या बँकांचे जुने चेकबुक रद्द होणार आहे. ओरिएंटल आणि यूनायडेट बँकेचं पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलिनीकरण झाल्याने (Punjab National Bank) या बँकांचे जुने चेकबुक रद्द केले जाणार आहे. 1 एप्रिल 2020 पासून हे विलिनीकरण झाले आहे. त्यामुळे या बँकांचे जुने चेकबुक 1 ऑक्टोबरपासून अमान्य असणार आहे. 1 ऑक्टोबरपासून नाही चालणार जुनं चेकबुक पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank Tweet) एका ट्वीटद्वारे म्हटले आहे की, 1 ऑक्टोबरपासून ओबीसी आणि यूबीआय बँकांची जुनी चेकबुक पैसे भरण्यासाठी किंवा बँकेतून पैसे काढण्यासाठी काम करणार नाहीत. ग्राहकांना नवीन चेकबुक घ्यावे लागेल. ज्यांच्याकडे जुने चेकबुक आहे त्यांनी ते बदलून घ्या. आता नवीन चेकबुक नवीन IFSC कोड आणि PNB चा IMCR नंबरसह तुम्हाला मिळेल.
नवीन चेकबुकसाठी करा अप्लाय तुम्ही बँकेच्या शाखेला भेट देऊन नवीन चेकबुक मिळवू शकता. ग्राहक ऑनलाइन अर्जही करू शकतात. तुम्ही इंटरनेट किंवा मोबाईल बँकिंगद्वारे ऑनलाईन चेकबुकसाठी अर्ज करू शकता. हे वाचा- Online Banking वापरून मिळवता येईल 5 वर्षांपूर्वीचे बँक स्टेटमेंट? असा आहे नियम कोणतीही समस्या आल्यास कस्टमर केअरशी करा संपर्क जर तुम्हाला चेकबुक मिळवण्यात कोणतीही अडचण येत असेल तर तुम्ही कस्टमर केअरला देखील कॉल करू शकता. येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. पीएनबीचा टोल फ्री क्रमांक 18001802222 आहे.