JOIN US
मराठी बातम्या / मनी / Airplane Facts: पांढऱ्या रंगाचंच का असतं विमान? इंट्रेस्टिंग आहे कारण

Airplane Facts: पांढऱ्या रंगाचंच का असतं विमान? इंट्रेस्टिंग आहे कारण

Airplane Facts: प्रत्येक एअरलाइन्स कंपनी विमानाचे ब्रँडिंग आणि टॅगलाइनसह इतर गोष्टी वेगवेगळ्या रंगांमध्ये करू शकतात. परंतु ते विमानाचा मूळ रंग पांढरा ठेवतात.

जाहिरात

विमानाचा रंग पांढराच का?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 मे: तुम्ही विमान आकाशात अनेकदा उडताना पाहिलं असेल. त्यात बसून अनेकदा तुम्ही प्रवास देखील केला असेल. या दरम्यान, तुमच्या लक्षात आले आहे का की बहुतेक विमानांचा रंग पांढराच का असतो? अखेर असं काय कारण आहे की काही विमान सोडली तर बहुतेक विमानांचा रंग पांढरा असतो. तुम्हाला याचं कारण माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला ते सांगणार आहोत. प्रत्येक एअरलाइन्स कंपनी वेगवेगळ्या रंगांमध्ये विमानाचे ब्रँडिंग आणि टॅगलाइन अशा काही गोष्टी करू शकते. परंतु ते जहाजाचा मूळ रंग पांढरा ठेवतात. विमानांची दुनिया या सिरीजमध्ये आज आपण ही महत्त्वाची गोष्ट जाणून घेणार आहेत.

…म्हणून पांढरा असतो विमानाचा रंग

विमानाचा रंग पांढरा ठेवण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पांढरा रंग सूर्यप्रकाशाला रिफ्लेक्ट करतो. त्यामुळे विमानावर पडल्यानंतर सूर्यप्रकाश बाउंस होतो. अशा वेळी निळ्या आणि लख्ख आकाशातही विमान सहज दिसतं. याशिवाय, सूर्यप्रकाश रिफ्लेक्ट झाल्यामुळे विमानाचा पृष्ठभाग गरम होत नाही. त्यामुळे विमानातील प्रवाशांना उष्णता जाणवत नाही. दुसरीकडे, इतर रंग सूर्यप्रकाश शोषून घेतात, ज्यामुळे फ्लाइटच्या लोकांना खूप अस्वस्थ वाटते.

शेकडो लोकांना घेऊन आकाशात उडणारं विमान किती रुपयांचं? कधी विचार केलाय?

तुम्हाला माहिती असेलच की, विमान उंचीवर उड्डाण केल्यामुळे, त्याला अनेक प्रकारच्या वायुमंडलीय परिस्थितींचा सामना करावा लागतो. इतक्या परिस्थितीतून गेल्यावरही विमानाचा रंग फिका पडू नये, म्हणून विमानाचा रंग पांढराच ठेवला आहे. यासोबतच विमानाचे सौंदर्यही अबाधित राहते. विमानाच्या पांढऱ्या रंगामुळे, त्यावर कोणत्याही प्रकारचे नुकसान, क्रॅक इत्यादी सहज शोधता येतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही ते खूप फायदेशीर आहे.

Airplane Facts: विमानाची खिडकी चौकोनी का नसते, गोलच का असते? इंट्रेस्टिंग आहे कारण

संबंधित बातम्या

अनेकदा असे दिसून आले आहे की टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळी पक्ष्यांची विमानाशी टक्कर झाल्यामुळे अनेक प्रकारचे अपघातही घडतात. अशा परिस्थितीत हे अपघात रोखण्यासाठी विमान कंपन्या विमानाचा रंग पांढऱ्या रंगाने रंगवतात. यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे विमानाच्या पांढर्‍या रंगामुळे त्याची व्हिजिबिलिटी चांगली असते, त्यामुळे पक्ष्यांना दूरवरून विमानाची कल्पना येते आणि मोठा अपघात टळतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या