JOIN US
मराठी बातम्या / मनी / Aadhaar Card: आधार कार्डबाबत मोठी बातमी, नवीन नियम संपूर्ण देशात लागू, जाणून घ्या

Aadhaar Card: आधार कार्डबाबत मोठी बातमी, नवीन नियम संपूर्ण देशात लागू, जाणून घ्या

आधार कार्डसाठी नवीन निर्देश जारी करण्यात आला आहे. यानुसार तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुमचे आधार कार्ड वापरू शकणार नाही.

जाहिरात

आधार कार्ड

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 जानेवारी: आधार कार्ड सर्व नागरिकांना आवश्यक आहे. कोणत्याही सरकारी योजनेत लाभ घेण्यापासून ते बँक आणि मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. अशा वेळी, त्याची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. ज्यामुळे UIDAI वारंवार नियम बदलत आहे. आता आधार कार्ड जारी करणाऱ्या संस्थेने नवा आदेश जारी केला आहे. UIDAI च्या नवीन निर्देशांनुसार, आता कोणत्याही यूझर्सला आधार सर्टिफिकेशनपूर्वी ऑनलाइन किंवा ऑफलाइन परवानगी घेणे आवश्यक आहे. आधार धारकांना परवानगीशिवाय ते वापरता येणार नाही, कारण आदेशाशिवाय त्याचे व्हेरिफिकेशन होणार नाही. तुम्ही ही परवानगी ऑनलाइन किंवा ऑफलाइन घेऊ शकता.

‘या’ तारखेपूर्वी लिंक करुन घ्या Aadhaar-Pan, अन्यथा भरता येणार नाही टॅक्स; जाणून घ्या सोपी पद्धत

UIDAI ने काय सूचना दिल्या

UIDAI ने रिक्वेस्ट करणार्‍या संस्थांना निर्देश दिले की, जो व्यक्ती आधार सर्टिफिकेशन ऑनलाइन करत आहे त्याने त्याची गरज जाणून घ्यावी. यूआयडीएआयने सांगितले की, यूझर्सला संपूर्ण कारण सांगून व्हेरिफिकेशनसाठी मंजुरी घ्यावी लागेल. तसेच ज्यावेळी व्हेरिफिकेशन केले जाईल तेव्हा संपूर्ण कागदपत्रे सोबत असावीत.

फसवणुकीची माहिती त्वरित द्या

आधार कार्डच्या संस्थेने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर यूझर्सला कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीशी संबंधित कोणतीही माहिती मिळाली तर त्याची माहिती त्वरित द्यावी. सोबतच त्याचा रिपोर्टही दाखल करावा. UIDAI  ने म्हटले आहे की, जर कोणी आधार कार्डशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या अपडेटसाठी जास्त पैसे मागितले तर तुम्ही 1947 वर तक्रार करू शकता.

Loan Application सारखं रिजेक्ट होतंय का? मग हे वाचाच

संबंधित बातम्या

आधार कार्ड पॅनशी लिंक करा

आधार कार्डला पॅन कार्डसोबत अपडेट करण्याची अखेरची तारीख 31 मार्च आहे, जी 1000 रुपये दंडासह जमा केली जात आहे. जर तुम्ही अद्याप तुमचे आधार कार्ड पॅनशी लिंक केले नसेल, तर ते त्वरित करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या