JOIN US
मराठी बातम्या / मनी / स्वस्त दरात सोनं खरेदी करण्याची संधी; 11,500 रुपयांनी घसरले भाव, पाहा काय आहे आजचा Gold Rate

स्वस्त दरात सोनं खरेदी करण्याची संधी; 11,500 रुपयांनी घसरले भाव, पाहा काय आहे आजचा Gold Rate

या वर्षात सोने दरात मोठी घसरण झाली आहे. भारतात सोन्याचे दर 2021 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत जवळपास 5000 रुपयांनी खाली आले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 8 मार्च : आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी भारतीय बाजारात सोने दरात घसरण पाहायला मिळाली आहे. तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून, आज वायदे भाव 44731 रुपये प्रति 10 ग्रॅम स्तरावर ट्रेड करतो आहे. तर चांदी 1.3 टक्क्यांनी वाढून 66,465 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे. या वर्षात सोने दरात मोठी घसरण झाली आहे. भारतात सोन्याचे दर 2021 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत जवळपास 5000 रुपयांनी खाली आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी - आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यात तेजी आहे. अमेरिकेत सोन्याचा भाव 4.05 डॉलरच्या तेजीसह 1,704.84 डॉलर प्रति औंस आहे. तर चांदीचा भावही 0.36 डॉलरच्या वाढीसह 25.61 डॉलरच्या स्तरावर आहे.

(वाचा -  स्वस्त दरातील औषधांसह, रोजगाराच्या संधीही उपलब्ध; काय आहे मोदी सरकारचा प्लॅन )

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, जगभरात कोरोना वॅक्सिनेशन अभियान जोर पकडत आहे, तसं लोक गुंतवणुकीच्या इतर पर्यांयांकडे वळत आहेत. त्यामुळे सोने दरात घसरण झाली आहे. परंतु ही स्थिती अधिक काळापर्यंत राहिल अशी शक्यता जाणकारांना वाटत नाही. जगभरातील शेअर बाजारांसह इंडियन स्टॉक एक्सचेंजनेही जोर पकडला आहे. शेअर बाजार वाढत असताना त्याच्या नफ्यासह जोखीमही वाढत असते.

(वाचा -  Gold Price: सोने-चांदी दरात 13000 रुपयांहून अधिक घसरण; पाहा किंमती आणखी किती कमी-जास्त होणार )

अशात गुंतवणुकदार पुन्हा एकदा सर्वात सुरक्षित पर्याय असलेल्या सोन्यात गुंतवणूक करतील. त्यामुळेच सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. जाणकारांचं म्हणणं आहे की, 2021 मध्ये सोन्याचे दर वाढणार आहेत. असा अंदाज आहे की, सोन्याचे दर वाढू लागले, तर ते 63000 रुपयांपर्यंत पोहचू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या