नवी दिल्ली, 07 जानेवारी: खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या IDFC First बँकेने नवीन वर्षात ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. बँकेने बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजामध्ये एका टक्क्याने वाढ केली आहे. सुरुवातीला तुमच्या खात्यामध्ये 1 लाखापर्यंतची रक्कम असेल तर 6 टक्के दराने व्याज मिळत असे आता 1 जानेवारी 2021 पासून हा दर 7 टक्के करण्यात आला आहे. आयडीएफसी देत आहे दुप्पट व्याज याआधी ज्या ग्राहकांच्या बचत खात्यामध्ये 1 लाख रुपयांपेक्षा जास्त बॅलन्स आहे त्यांना 7 टक्के दराने व्याज मिळत असे. सध्या सरकारी बँकांमध्ये मिळणाऱ्या व्याजाचा तुलनेत आयडीएफसी बँकेत दुप्पट व्याज मिळते आहे. SBI, HDFC, ICICI आणि PNB यासारख्या मोठ्या सरकारी आणि खाजगी बँका बचत खात्यावर 3 ते 4 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. आयडीएफसी फर्स्ट बँक ग्राहकांना बचत खात्यावर 7 टक्के दराने व्याज देते आहे. कसे उघडाल ऑनलाइन बँक खाते? -या बँकेत खाते उघडण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइट https://www.idfcfirstbank.com/ वर जावे लागेल. - यानंतर तुम्हाला Saving Accounts- up to 7% p.a. या पर्यायावर क्लिक करावे लागेल -याठिकाणी ओपन झालेल्या पेजमध्ये तुम्हाला तुमचं नाव, मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडी प्रविष्ट करावा लागेल, त्यानंतर Start Now वर क्लिक करा. (हे वाचा- PhonePe ने सुद्धा सुरू केली विमा योजना; 149 रुपयांपासूनचे प्लॅन्स ) -आता नवीन पेज ओपन होईल जिथे तुम्हाला आधार क्रमांक टाकून व्हेरिफिकेशन करावे लागेल. -याठिकाणी देण्यात आलेल्या अॅप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्हाला आवश्यक सर्व माहिती भरावी लागेल. -यानंतर फॉर्म प्रीव्ह्यूचा पर्याय आहे. -तुम्ही खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता, जर झिरो बॅलन्सचा पर्याय निवडला असेल, तर कोणतीही रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. (हे वाचा- Petrol Diesel Price: कोलमडतंय सामान्यांचं बजेट, सलग दुसऱ्या दिवशी इंधनाच्या दरात ) खातं उघडण्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक? या बँकेत खातं उघडण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, 2 पासपोर्ट साइझ फोटो आणि बर्थ सर्टिफिकेट द्यावं लागेल. ही कागदपत्र देऊन अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बचत खाते उघडू शकता.