JOIN US
मराठी बातम्या / मनी / लखपती बनवेल हे 50 पैशांचं नाणं, तुमच्याकडे असल्यास आजच करा हे काम

लखपती बनवेल हे 50 पैशांचं नाणं, तुमच्याकडे असल्यास आजच करा हे काम

अनेकदा काही वस्तू आपण निरोपयोगी समजून त्यांचा वापर करत नाही. त्या अशाच कुठेतरी पडून राहतात. असाच काहीसा प्रकार जुन्या नोटा आणि नाण्यांबाबत घडतो. तुमच्याकडे देखील अशी जुनी नाणी असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 04 जुलै: अनेकदा काही वस्तू आपण निरोपयोगी समजून त्यांचा वापर करत नाही. त्या अशाच कुठेतरी पडून राहतात. असाच काहीसा प्रकार जुन्या नोटा आणि नाण्यांबाबत घडतो. तुमच्याकडे देखील अशी जुनी नाणी असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या नाण्यांचा वापर करून तुम्ही लखपती बनू शकता. ज्यांना जुनी नाणी-नोटा जमवण्याचा छंद आहे, त्यांच्यासाठी तर ही पर्वणीच आहे. तुमच्याकडे हे खास 50 पैशांचं नाणं असेल तर तुमच्याकडे लाखो कमावण्याची संधी आहे. कोणतं 50 पैशांचं नाणं बनवेल लखपती? तुम्हाला 50 पैशांचं हे खास नाणं लखपती बनवू शकतं. हे विशेष नाणं 2011 साली बनवण्यात आलेलं आहे. याकरता तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवरून ओएलएक्स (OLX) वर लॉग इन करावं लागेल. OLX हे एक ऑनलाइन मार्केटप्लेस आहे ज्याठिकाणी तुम्ही वस्तू खरेदी करू शकता किंवा विकू शकता. हे वाचा- खूशखबर! जनधन खातेधारकांना मिळेल 1.3 लाख रुपयांचा फायदा, वाचा सविस्तर सध्या OLX वर 2011 साली बनवण्यात आलेल्या या 50 पैशांच्या नाण्याची मागणी आहे. हे नाणं मिळवण्यासाठी लोकं 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम देण्यास तयार आहेत. 2011 सालापासून सरकारने 50 पैशांचं नाणं बनवणं बंद केलं होतं, याच वर्षी 25 पैशांचं नाण चलनातून रद्द करण्यात आलं होतं. 25-50 पैशांचं हे चलन 2011 मध्ये संपुष्टात आलं होतं. सरकारद्वारे याचा वापर बंद होण्याआधीच लोकांनी याचा वापर बंद केला होता. मात्र आता हे नाणं अद्यापही तुमच्याकडे असेल तर तुम्ही लखपती बनू शकता. कशाप्रकारे कराल विक्री? हे नाणं विकण्यासाठी तुम्हाला OLX साइटवर नोंदणी करावी लागेल. यानंतर तुमच्याकडे असणाऱ्या नाण्याचा फोटो साइटवर अपलोड करावा लागेल आणि नाणं विक्रीसाठी द्यावं लागेल. हे वाचा- मुंबईतील घराचं स्वप्न करा पूर्ण,राज्यात इतरही जागी स्वस्त प्रॉपर्टी खरेदीची संधी दरम्यान अशा प्रकरणात सावधानता बाळगून, पडताळणी करून विक्री करणं आवश्यक आहे. जास्त पैसे कमावण्याच्या लालसेपोटी तुमची फसवणूक होऊ शकते. अशा काही घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे तुम्हालाच अशाप्रकारच्या फ्रॉडपासून वाचण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. शिवाय फेक न्यूजपासून देखील बचाव करणं आवश्यक आहे. (डिस्क्लेमर- ही बातमी वेबसाइटवरुन मिळालेल्या माहितीच्या आधारे बनवण्यात आलेली आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या