JOIN US
मराठी बातम्या / मनी / केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा! आईवडिलांना कोरोना झाल्यास मोदी सरकार देणार 15 दिवसांची विशेष सुट्टी

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा! आईवडिलांना कोरोना झाल्यास मोदी सरकार देणार 15 दिवसांची विशेष सुट्टी

केंद्र सरकारने अशी घोषणा केली आहे की कर्मचाऱ्यांचे आई-वडील किंवा त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबातील सदस्याला कोरोना झाल्यास त्यांना 15 दिवसांची स्पेशल कॅज्युअल लीव्ह (Special casual leave) दिली जाईल

जाहिरात

Navi Mumbai: A lone staff member works in a government office in Konkan Bhavan after lockdown amid the coronavirus outbreak, in Navi Mumbai, Monday, March 23, 2020. (PTI Photo)(PTI23-03-2020_000163B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 जून: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. केंद्र सरकारने (Central Government of India) अशी घोषणा केली आहे की, कर्मचाऱ्यांचे आई-वडील किंवा त्यांच्यावर थेट अवलंबून असणारे कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह (COVID-19 Positive) आढळू आल्यास कर्मचाऱ्यांना 15 दिवसांची स्पेशल कॅज्युअल लीव्ह (Special casual leave) दिली जाईल. सरकारने त्यांच्या सर्व स्टाफला ही 15 दिवसांची सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. तुमच्याकडे एकही सुट्टी शिल्लक नसेल तरीही ही 15 दिवसांची विशेष सुट्टी घेता येईल. मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ पर्सनेल अँड ट्रेनिंगने दिलेल्या माहितीमध्ये असे सांगितले की जर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य या स्पेशल सुट्टीदरम्यानही ठीक झाले नाहीत तर कर्मचाऱ्यांना संबंधित व्यक्तीच्या डिस्चार्ज होईपर्यंत वेगळी सुट्टी दिली जाईल. कोरोना काळात केली ही महत्त्वाची घोषणा देशभरात कोरोनाचा (Coronavirus in India) हाहाकार सुरू आहे, त्याच पार्श्वभूमिवर ही घोषणा करण्यात आली आहे. नोकरीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना बऱ्याचदा त्यांच्या कुटुंबीयांकडे लक्ष देता येत नाही, अशावेळी सरकारने या स्पेशल सुट्टीबाबत घोषणा केली आहे. हे वाचा- पित्याचं कर्ज फेडण्यासाठी तो होता नोकरीच्या शोधात, उभारली 70 हजार कोटींची कंपनी सरकारने जारी केले आदेश सरकारच्या पर्सनेल मिनिस्ट्रीने यासंदर्भाक विविध लोकांशी चर्चा केली. यामध्ये हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर घ्यावी लागणारी काळजी आणि क्वारंटाइन काळाबाबत चर्चा करण्याच आली. ज्यानंतर सरकारने हा आदेश जारी केला आहे. कर्मचारी स्वत: कोरोना पॉझिटिव्ह आले तर काय? जर केंद्रीय कर्मचारी स्वत: कोविड-19 पॉझिटिव्ह आल्यास त्याला 20 दिवसांच्या सुट्टीसाठी अर्ज करता येईल. याशिवाय संक्रमणानंतर 20 दिवसांसाठी कम्यूटेड लीव्ह किंवा SCL किंवा EL (Earned Leave) मिळू शकते. यासह सुरुवातीचे सात दिवस ऑन ड्युटी मानले जातील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या