JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Yavatmal Rain Update : नसतं धाडस; पूल ओलांडताना दोघेजण दुचाकीसह गेले वाहून, झाडामुळे वाचला जीव

Yavatmal Rain Update : नसतं धाडस; पूल ओलांडताना दोघेजण दुचाकीसह गेले वाहून, झाडामुळे वाचला जीव

Yavatmal Rain Update : राळेगाव तालुक्यातून काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर आला आहे. नसतं धाडस केल्याने दोन युवकांच्या अंगाशी आलं होतं.

जाहिरात

नसतं धाडस

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

यवतमाळ, 19 जुलै : राज्यातील बहुतांश भागात मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. सोमवारपासून कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाड्यात सर्वदूर हलका पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक जिल्ह्यात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी नाले ओसांडून वाहत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातही सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, राळेगाव तालुक्यातून काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर आला आहे. नसतं धाडस अंगाशी यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील खैरी गावापासून काही अंतरावर असलेल्या एका पुलावरुन पाणी वाहत असताना दोन युवकांनी नको ते धाडस केलं. पुलावरुन पाणी वाहत असताना दुचाकी घेऊन रस्ता पार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पाण्याचा वेग वाढला आणि दुचाकीसह दोघे पुराच्या पाण्यात वाहून गेले. मात्र, सुदैवाने काही अंतरावर त्यांना नाल्याच्या काठावर असलेल्या एका झाडाला दुचाकी अडकली. त्याच वेळी दोघेही नाल्याच्या काठावर फेकल्या गेले. त्यामुळे जीवितहानी टळली. ही घटना प्रत्यक्षदर्शीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे. नितेश कन्नाके, मंगेश तुमराम अशी बचावलेल्या युवकांची नावे आहेत.

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून बुधवारी (ता. 19) पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून अनेक ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्यता आहे. यामुळे खरिपात रखडलेल्या पेरण्यांना वेग येणार असून उगवून आलेल्या पिकांना पावसामुळे दिलासा मिळणार आहे. कोकणातील ठाणे, रत्नागिरी, सिंदुधुर्ग जिल्ह्यांतील अनेक भागांत दोन दिवसांपासून हलका ते मध्यम पाऊस पडला. तर पालघर, रायगड जिल्ह्यांतील सर्वदूर जोरदात ते मुसळधार पाऊस कोसळला आहे. मंगळवारी (ता. 18) सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणातील रायगडमधील माणगाव येथे सर्वाधिक 250, तर पेण येथे 221.3 मिलिमीटर पाऊस पडला. वाचा - देवाक काळीज रे…, कुठे संसार गेल्या पाण्यात तर कुठे लेकरू गेलं वाहून, पावसाचे मन सुन्न करणारे 5 VIDEO खानदेशातील नाशिक, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत पावसाच्या कमीअधिक पाऊस होता. तर धुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत ढगाळ वातावरणाची स्थिती कायम असली तरी तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या