JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / काळिमा! सख्ख्या पुतण्यासोबत महिलेचं विकृत कृत्य; दोरीने गळा आवळून केला शेवट

काळिमा! सख्ख्या पुतण्यासोबत महिलेचं विकृत कृत्य; दोरीने गळा आवळून केला शेवट

Murder in Nanded: नात्याने सख्खी मावशी आणि चुलती लागणाऱ्या एका महिलेनं 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृण पद्धतीने हत्या (Minor nephew brutal murder) केली आहे.

जाहिरात

प्रातिनिधीक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नांदेड, 01 नोव्हेंबर: नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील एका गावात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. नात्याने सख्खी मावशी आणि चुलती लागणाऱ्या एका महिलेनं 13 वर्षीय अल्पवयीन मुलाची निर्घृण पद्धतीने हत्या (Minor nephew brutal murder) केली आहे. आरोपी महिलेनं दोरीने गळा आवळून आपल्या पुतण्याला संपवलं आहे. एवढंच नव्हे तरी महिला स्वत: माळाकोळी पोलीस ठाण्यात हजर राहून गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी महिलेनं गुन्ह्याची कबुली देताच पोलिसांनी तिला अटक केली आहे. तिने नेमकी कोणत्या कारणातून हत्या केली, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे. सुयोग रामचंद्र नागसाखरे असं हत्या झालेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलाचं नाव आहे. तर अरुणा सोमेश्वर नागसाखरे असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा- गर्भपाताचा प्रयत्न करूनही झाला मुलीचा जन्म; क्रूर आईनं केला नवजात चिमुकलीचा सौदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही मूळची खेडकरवाडी येथील असून तिचे माहेर कामजळगेवाडी आहे. आरोपी महिलेनं नात्याने सख्ख्या बहिणीचा मुलगा आणि पुतण्या असलेल्या 13 वर्षीय सुयोग रामचंद्र नागसाखरे याची दोरीने गळा आवळून हत्या केली आहे. संबंधित घटना रविवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे. हेही वाचा- गुंगीचं औषध देत सुरू झाला भयंकर खेळ; नराधम 2वर्षापासून तरुणीला देत होता नरकयातना पुतण्याची हत्या केल्यानंतर, आरोपी महिला स्वत: माळाकोळी पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाली आहे. तिने खुनाची कबुली दिली आहे. तिने नेमक्या कोणत्या कारणातून पुतण्याची हत्या केली, याबाबत अद्याप कोणताही खुलासा झाला नाही. मृत मुलाचे वडील रामचंद्र नागसाखरे यांच्या फिर्यादीवरून माळाकोळी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या