JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'मी शिवसेनेत होतो तेव्हा ते खासदार सुद्धा नव्हते', भुजबळांचा राऊतांना टोला

'मी शिवसेनेत होतो तेव्हा ते खासदार सुद्धा नव्हते', भुजबळांचा राऊतांना टोला

‘सन्माननीय संजय राऊत (sanjay raut) हे महाविकास आघाडीचे (mva government) शिल्पकार आहे. त्यामुळे या शिल्पाला तडा जाऊ नये याची जबाबदारी शिल्पकाराची अधिक आहे’

जाहिरात

'सन्माननीय संजय राऊत (sanjay raut) हे महाविकास आघाडीचे (mva government) शिल्पकार आहे. त्यामुळे या शिल्पाला तडा जाऊ नये याची जबाबदारी शिल्पकाराची अधिक आहे'

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नाशिक, 25 ऑक्टोबर :  ‘सन्माननीय संजय राऊत (sanjay raut) हे महाविकास आघाडीचे (mva government) शिल्पकार आहे. त्यामुळे या शिल्पाला तडा जाऊ नये याची जबाबदारी शिल्पकाराची अधिक आहे. मी जेव्हा शिवसेना (shivsena) मोठी केली तेंव्हा ते खासदार देखील नव्हते’ असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांना लगावला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संजय राऊत यांनी भाजपवर तर टीकास्त्र सोडलेच पण छगन भुजबळ यांनाही कोपरखळी लगावली. त्यांच्या या विधानावर छगन भुजबळ यांनी आज आपल्या शैलीत खास उत्तर दिलं. IIP Recruitment: भारतीय पॅकेजिंग संस्था मुंबई इथे 80,000 रुपये पगाराची नोकरी ‘पाहुणचार देण्याघेण्याची सवय आहे. सन्माननीय संजय राऊत साहेब हे महाविकास आघाडीचे शिल्पकार आहे. त्यामुळे या शिल्पाला तडा जाऊ नये याची जबाबदारी शिल्पकाराची अधिक आहे, असा सल्लावजा टोला भुजबळांनी राऊत यांना लगावला. तसंच, शिवसेनेत मुख्यमंत्री झालो असतो असं म्हटलं, हे मान्य मात्र कुणालाही पक्षात काम केल्या शिवाय जबाबदारी मिळत नाही. संजय राऊत राऊत यांनाही सामनाच संपादक काम केल्यानेच केलं आहे. मी जेव्हा शिवसेना मोठी केली तेंव्हा ते खासदार देखील नव्हते, असा चिमटाही भुजबळांनी राऊतांना काढला. So cute! ‘मनिके मागे हिते’चं बोबडं व्हर्जन; चिमुकलीच्या आवाजात हे गाणं ऐकलंत का? ‘नांदगाव मतदारसंघ, विसरा अस ते म्हणाले या बाबत मला पवार साहेबांशी बोलावं लागेल. नांदगावमध्ये मी जे काम केलं ते त्यांना माहीत नसावं कारण त्यांना गल्ली पासून दिल्ली पर्यंत काम करावं लागतं. त्यामुळे मी त्यांना आमंत्रित करतो त्यांनी या मतदारसंघात परत परत यावे, असा खोचक टोलाही भुजबळांनी राऊतांना लगावला. ‘आमचे नेते जयंत पाटील देखील तेथे येऊन गेले  त्यांनीही 100 प्लस आमदार निवडून आणण्याचं आव्हान केलं आहे, असंही भुजबळ म्हणाले. काय म्हणाले होते राऊत? नांदगावला कार्यकर्त्याच्या मेळाव्यात छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या वादात संजय राऊत यांनी उडी घेत भाष्य केलं होतं. ‘नांदगाव मतदार संघात भगवा फडकलेला असून आता तो खाली येणार नाही त्यामुळे भुजबळांनी हा मतदारसंघ विसरावे असा सल्ला दिला. मी शिवसेनेत असतो तर मुख्यमंत्री झालो असतो, भुजबळांच्या या वक्त्यांव्यावर राऊत यांनी शिवसेनेच्या पुण्याईवर तुमचे राजकारण सुरू असून जर आघाडी सरकार सत्तेवर आले नसते तर तुम्ही पालकमंत्री झाले नसते, असा टोला लगावला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या