JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ‘माझी चिमुकली गेली..’, आईने फोडला हंबरडा; सगळ्यांच्या काळजाचं झालं पाणी!

‘माझी चिमुकली गेली..’, आईने फोडला हंबरडा; सगळ्यांच्या काळजाचं झालं पाणी!

आईने माहेरी जाताना मुलीला वडिलांकडे ठेवलं होतं. सकाळी जेव्हा त्यांच्या खोलीचं दार उघडलं गेलं तेव्हा सगळ्यांना हे धक्कादायक दृश्य दिसलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

 राहुरी 30 ऑक्टोबर: वडिल आणि मुलांचं नातं हे संवेदनशील आणि प्रेमाच्या पलिकडचं असतं. मात्र या सगळ्या भाव-भावनांना बाजूला सारत एका बापाने क्रुरतेचा कळस गाठला. आपल्या चिमुकल्या तीन वर्षीय मुलीची गळा दाबून बापाने हत्या केली आणि मुलीच्या हत्येनंतर गळफास लावून आपले जीवन संपवलं संपवल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात घडली आहे. घटनेच्या वेळी मुलीची आई ही घरी नव्हती. घटना कळाल्यानंतर तीला जबर धक्का बसला. माझी चिमुकली गेली म्हणत तिने हंबरडा फोडला आणि सगळ्यांच्या काळजाचं पाणी झालं. राहुरी तालुक्यातील दवणगाव येथील ही धक्कादायक घटना आहे. बापाने आपल्या चिमुरडीचा गळा घोटला आणि स्वतःलाही गळफास लावून आयुष्य संपवलं. शुक्रवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनिल पाळंदे (45) यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. अनिल पाळंदे यांची पत्नी माहेरी गेलेली होती. जाताना त्यांनी तीन वर्षांची मुलगी अधीराला आपल्या वडिलांसोबतच दवणगाव येथे सोडलं होतं. आज सकाळी तीचा मृतदेह आणी गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत अनिल पाळंदे आढळून आले. सकाळी जेव्हा त्यांच्या खोलीचं दार उघडलं गेलं तेव्हा सगळ्यांना हे धक्कादायक दृश्य दिसलं. रझा अकादमीवर बंदी घालण्याची हिम्मत राज्य सरकारनं दाखवावी, भाजप आमदाराचं पत्र त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीसांनी दोघांचेही मृतदेह पोस्टमार्टेमसाठी सरकारी दवाखाण्यात हलवले आहे. अनिल पाळंदे यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अजूनही माहिती मिळाली नाही. मात्र कौटुंबिक कलहातून किंवा कर्जबाजारी झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे. विधवा सूनेचं प्रेमप्रकरण समजताच सासऱ्यानं तिच्यासह प्रियकराला ट्रॅक्टरनं चिरडलं चिमुकल्या मुलीचा जीव घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.पोलीस याबाबत अधिक तपास करत असून त्यानंतरच या घटनेचा उलगडा होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या