JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राज्यात अनेक ठिकाणी पारा चाळिशीच्या उंबरठ्यावर; हवामान विभागाचा या जिल्ह्यांसाठी इशारा

राज्यात अनेक ठिकाणी पारा चाळिशीच्या उंबरठ्यावर; हवामान विभागाचा या जिल्ह्यांसाठी इशारा

Weather forecast today: अचानक झालेल्या हवाबदलाचे परिणाम जाणवू लागले आहेत. आता पुढचे काही दिवस लहरी हवेचा असाच फटका बसणार असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 मार्च: गेल्या काही दिवसांपासून अचानक हवा बदलली आहे. थंडीनं अचानकच एक्झिट घेऊन झळा वाढल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात तापमानाचा पारा वाढला आहे. मुंबई, पुण्यात चांगचीच काहिली जाणवून लागली आहे. ठाणे जिल्ह्यात तर मार्चच्या पहिल्या आठवड्यातच पाऱ्याने चाळीशी गाठली. कोकण, मध्य महाराष्ट्रासोबत विदर्भातही पारा आता चढू लागला आहे. अचानक झालेल्या हवाबदलाचे परिणाम जाणवू लागले आहेत. आता पुढचे काही दिवस लहरी हवेचा असाच फटका बसणार असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यात यंदा काही भागात कडाक्याची थंडी पडली होती. त्यानंतर अचानक विविध भागात जोरदार पावसानेही हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच शहरी भागात राहणाऱ्या लोकांची पुरती धांदल उडाली होती. सध्या पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या चक्राकार प्रवाहामुळे कर्नाटकच्या किनाऱ्यापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरणाची स्थिती तयार झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात प्रचंड वाढ होताना दिसत आहे. परिणामी या भागांत किमान आणि कमाल तापमानात अशंतः वाढ नोंदविण्यात आली आहे. राज्यातील अकोला, बुलढाणा, वर्धा या जिल्ह्यात सरासरी कमाल तापमानाच्या तुलनेत चार अंश सेल्सियस पर्यंत वाढ झाली आहे. तर विदर्भात तापमानाचा पारा चाळीशीच्या उबरठ्यावर पोहचला आहे. त्यामुळे चंद्रपूर, वाशीम आणि अकोला या तीन जिल्ह्यात पुढचे पाच दिवस ‘हिट वेव’चा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे ही वाचा - आयुष्यभराची पुंजी काही मिनिटांत राख; हिंगणघाटमधील दुर्घटनेमुळे शेतकरी हादरला सध्या विदर्भाचं तापमान समान्य तापमानापेक्षा 4 ते 6  अंश सेल्सिअसने अधिक आहे. आज विदर्भात ब्रह्मपुरी (39.08 अंश सेल्सियस) या ठिकाणी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तर चंद्रपूर 39.02, वाशीम 39, अकोला 39.01 आणि नागपूर 37.06 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिना हा तापमान स्थित्यांतराचा काळ असल्याने मुंबईत आर्द्रता वाढली आहे. राज्यात यंदा कोकण आणि गोवा किनारपट्टी भागात पारा चढता राहणार आहे .या भागात पुढील चार दिवस हवामान कोरडं राहणार असून तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या