JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 5000 झाडांचा साजरा झाला 22 वा वाढदिवस; निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा पाहा VIDEO

5000 झाडांचा साजरा झाला 22 वा वाढदिवस; निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा पाहा VIDEO

निसर्ग हिल्स परिसरात 5000 हजार वृक्षांचा 22 वा वृक्षसंवर्धन दिवस हा वृक्षांचा वाढदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वर्धा : ऑक्सिजन पार्क (Oxygen Park wardha) निसर्ग हिल्स परिसरात 5000 हजार वृक्षांचा 22 वा वृक्षसंवर्धन दिवस हा वृक्षांचा वाढदिवस (Trees Birthday) म्हणून साजरा करण्यात आला. निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी वृक्षांचा वाढदिवस महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा केला जातो. यामध्ये विविध इंद्रप्रस्थ न्यू आर्ट्स कॉमर्स, सायन्स कॉलेज वर्धा, अनिकेत समाजकार्य महाविद्यालय, आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क्स, यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयकांच्या नेतृत्वात 400 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी केले श्रमदान विद्यार्थ्यांनी या परिसरात श्रमदान करून परिसर स्वच्छ केला. त्या सोबतच झाडांची सेवा म्हणून झाडाच्या आजूबाजूला वाढलेले गवत काढले. विद्यार्थ्यांनी निसर्ग विषयक आपली कृतज्ञता व्यक्त केली. झाडांचा वाढदिवस गेले 22 वर्षापासून साजरा केला जातो. 6 सप्टेंबर 2000 रोजी निसर्ग सेवा समितीने येथे झाडांची लागवड केली होती. त्यानंतर प्रत्येक वर्षी येथे झाडांचा वाढदिवस साजरा केला जातो. झाडे लागवड करण्याबरोबरच त्यांना जगवणे, निघा राखणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी वाढदिवसाचा सोहळा करण्यात येतो. हेही वाचा- यमराजाला शापमुक्त करणारे आशापूरक मंदिर, पाहा VIDEO …या प्रकारची झाडे  ऑक्सिजन पार्कमध्ये विविध प्रकारचे झाडे आहेत. मुख्य म्हणजे कडू लिंबू, वड, पिंपळ, करू, सीताफळ, अशोक, पांगरा, पाखड या प्रकारची झाडांची लागवड केली आहे. वाढदिवस कार्यक्रमावेळी अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,अतिथी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, शिक्षणाधिकारी मंगेश घोगरे, तहसीलदार रमेश कोळपे, प्रदीप दाते, डॉ. अनिल लोणारे, भाऊसाहेब थुटे, शेख हाशम, चंद्रशेखर दंडारे, संजय इंगळे तिगावकर, प्रकाश येंडे, ओंकार धावडे यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी झाडांचे महत्त्व सांगितले. एकाने 100 झाडे लावण्या पेक्षा शंभर लोकांनी मिळून जर 100 झाडे लावली तर ती जास्त दिवस जगतील. तसेच झाडे लागवडीत लोकांचा सहभाग वाढेल. हेही वाचा- खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट; सणाचा फायदा घेत दीडपट भाडेवाढ, पाहा VIDEO यावेळी इंद्रप्रस्थ न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज वर्धा, डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क वर्धा, प्रशांत गोलक्ष, डॉक्टर सुनीता भोईकर, डॉक्टर विलास माने, प्राचार्य मिलिंद सवाई यशवंत महाविद्यालय वर्धा, रितेश निमसडे, डॉक्टर विलास वाणी, प्रा. संदीप गिरडे, प्रा. निशांत चिकाटे, प्रकाश कांबळे, कृष्णा आकरे, राजकुमार वासेकर, गौतम फुलमाळी चित्रकार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दीपक डोंगरे, विक्रम रामदास कुदमेठे, मोहन मानमोडे, संजय मानमोडे, ओंकार धावडे, अनिल नरेडी, निसर्ग सेवा समितीची एक छोटीशी क्लिप माहिती प्रकाशित करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या