JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Virar News : काम संपवून घरी निघणार तोच चौघांवर 'काळ' कोसळला; तीन महिलांचा मृत्यू एक गंभीर

Virar News : काम संपवून घरी निघणार तोच चौघांवर 'काळ' कोसळला; तीन महिलांचा मृत्यू एक गंभीर

Virar News : विरारमध्ये इमारतीच्या निर्माणाधीन इमारतीची भिंत चार कामगारांवर कोसळली. या घटनेत तीन महिला कामगारांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे.

जाहिरात

विरारमध्ये भिंत कोसळून तीन ठार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विजय देसाई, प्रतिनिधी मुंबई, 6 जून : विरार पूर्वच्या मनवेल पाडा रोडवरील सूर्य किरण या बिल्डिंगचे रिडेव्हलपमेंटचे काम सुरू असताना भिंत कोसळून चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन महिला  कामगारांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. अचानक घडलेल्या या घटनेनंतर इतर कामगारांना काय करावं काही सुचेना. ही घटना स्थानिकांना समजताच त्यांनी मततीसाठी धाव घेतली. निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळली आज दुपारच्या सुमारास हे कामगार काम संपल्याने निघत होते. मात्र, काम संपल्यानंतर साचलेल्या पाण्यातच हात पाय धुण्यासाठी गेले असताना बांधलेली भिंत या कामगारांच्या अंगावर कोसळली. या भिंतीच्या  ढिगाऱ्याखाली चार कामगार अडकले होते. इतर नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर बचाव कार्य सुरू झाले. अग्निशमन पथकाच्या जवनांमार्फत त्यांनी या कामगारांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच तीन महिला कामगारांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला होता. या अपघातात जखमी असलेल्या एका मजुरावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या