JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO : एकाच्याही चेहऱ्यावर नव्हता मास्क; कोरोनाच्या कहरात नागपुरात वाजत-गाजत निघाली वरात

VIDEO : एकाच्याही चेहऱ्यावर नव्हता मास्क; कोरोनाच्या कहरात नागपुरात वाजत-गाजत निघाली वरात

आज दुसऱ्या दिवशीही नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येने दोन हजारांचा टप्पा पार केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 14 मार्च : नागपूरात आजही कोरोनाचा कहर आहे. आज दुसऱ्या दिवशीही नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येने दोन हजारांचा टप्पा पार केला. मात्र कडक निर्बंध असतानाही नागपुरकरांनी वाजत-गाजत वरात काढल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. नागपुरच्या महाल परिसरातही लग्नाची वरात काढण्यात आली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. वऱ्हाडी नाचण्यात दंग होते. शंभरहून अधिक लोक या वरातीत सामील झाले होते.  विशेष म्हणजे वरातीत एकाच्याही तोंडाला मास्क नव्हता. (No one had a mask on their face in wedding ceremony outbreak of corona in Nagpur) एकीकडे मागील तीन दिवसांपासून नागपूरात 2 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण दररोज सापडत असून सुद्धा नागपूरात लोकांना कोरोनाची भीती राहिली नाही असं दिसून येत आहे. लग्न समारंभात मोठ्या स्वरूपात बंदी असली तरी महाल या परिसरात एका लग्नाची वरात रविवारी निघाली. त्यामध्ये शेकडो वराती सहभागी झाले होते. सोशल डिस्टन्सिंगचा मोठा फज्जा उडाला. यामुळे पुन्हा कोरोनाचा प्रकोप वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

हे ही वाचा- Nagpur News:महाराष्ट्र पोलिसांनी मान शरमेने खाली,निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा विदर्भात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे.  गेल्या 24 तासातील कोरोनाची रुग्णसंख्या पाहता अधिक काळजी घेण्याची गरज आहे. नागपुरात राज्य सरकारने कडक निर्बंध लावले असतानाही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना दिसत आहे. 13 मार्च रोजी नागपुरात 2261 नवीन रुग्ण आढळून आले आणि 07 जणांचा मृत्यू झाला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने पुन्हा लॉकडाऊन लागू केला आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांत निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या