नागपूर 24 ऑक्टोंबर : भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या विदर्भावर पक्षाची मोठी भिस्त होती. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 2014ची स्थिती गाठण्यासाठीही दमछाक करावी लागण्याची शक्यता आहे. तर अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसू शकतो. भाजपचे मंत्री आणि यवतमाळचे उमेदवार मदन येरावार हे सहाव्या फेरीअखेर 2 हजार 473 मतांनी पिछाडीवर होते तर काँग्रेसचे बाळासाहेब मंगुळकर हे आघाडीवर आहेत. पक्षात असेली नाराजी, बंडखोरी याचा फटका मदन येरावार यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. दुपारी 12 वाजेपर्यंत विदर्भातल्या 62 जागांपैकी भाजप 26, शिवसेना 07, काँग्रेस 16 तर राष्ट्रवादी 04 जागांवर आघाडीवर आहे. कृषीमंत्री अनिल बोंडे हे पहिल्या काही फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होते मात्र नंतर त्यांनी आघाडी घेतली. राष्ट्रवादीने कशी फिरवली बाजी? ‘त्या’ पावसातल्या सभेचं होतं निमित्त विदर्भात कोण किती जागांवर पुढे? भाजप : २६ शिवसेना : ०७ काँग्रेस : १६ राष्ट्रवादी : ०४ अपक्ष : ०७ वंचित : ०१ स्वतंत्र भारत पक्ष :०१ एकूण जागा : ६२ 2014 ची विधानसभेची परिस्थिती मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. शिवसेनेला 63 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. एकूण जागा - 288 भाजप - 122 शिवसेना - 63 काँग्रेस - 42 राष्ट्रवादी - 41
गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अँटी एन्क्मबन्सीचा सामना करावा लागला होता. या वेळी हा फॅक्टर फडणवीस सरकारसाठी किती महत्त्वाचा ठरतो हे कळेल. राज्यात 15 वर्षांपासून असलेली सत्ता आघाडीने गमावल्यानंतर भाजप-सेना युतीचं सरकार आलं होतं. गेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला 145 जागांचा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे नंतर भाजप-शिवसेनेनं पुन्हा एकत्र येत युतीचे सरकार स्थापन केलं. या वर्षी निवडणुकीपूर्वीच युती आणि आघाडी झाल्याने कुठल्याच पक्षाने सर्वच्या सर्व जागा लढवल्या नाहीत. सर्वाधिक जागा लढवणारा पक्ष आश्चर्यकारकरीत्या बहुजन समाज पार्टी हा राहिला.