JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कुठे अवकाळी तर कुठे गारपीट, शेतकऱ्याचं अक्षरशः कंबरड मोडलं

कुठे अवकाळी तर कुठे गारपीट, शेतकऱ्याचं अक्षरशः कंबरड मोडलं

नाशिक जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील 4 तालुक्यांमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 20 फेब्रुवारी : राज्यातील अनेक भागात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. अशातच आता अनेक भागात गारपीट (Hailstorms) झाल्याचंही समोर येत असल्यानं शेतकरी हताश झाले आहेत.  सांगलीच्या तासगाव तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसानं झोडपून काढलं. यावेळी वादळी वाऱ्यात तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगरसोनी येथील तीन, सावळज येथील दोन आणि मणेराजुरी येथील एक अशा सहा द्राक्षबागा कोसळून भुईसपाट झाल्या. यामुळे शेतक-यांचे सुमारे ५२ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल आणि कृषि विभागाने द्राक्षबागांच्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत. द्राक्षबागांच्या बरोबरच गहू, शाळू, हरभरा, मका तसेच पालेभाज्या यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस सुरु असताना सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे बागेतील स्टेजिंगचा तोल बिघडला आहे. द्राक्षांचे वजन पेलू न शकल्याने तारा तुटून बागा कोसळल्याचं चित्र आहे. याशिवाय नाशिक जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील 4 तालुक्यांमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तलाठी तसंच कृषी अधिकाऱ्यांकडून पंचनामे सुरू आहेत. प्राथमिक तपासणीदरम्यान साडेसहा हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. या पावसाचा कापणीला आलेल्या द्राक्षबागांना फटका बसला आहे. येत्या गुरुवारपर्यंत या सर्वाचे पंचनामे पूर्ण करण्यात येतील. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 6 हजार 89 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. सटाण्यात 2 हजार 733 हेक्टरवरील पिकं आडवी झाली आहेत. तर निफाड , बागलाण , दिंडोरीमध्येदेखील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नागपूर जिल्ह्यातही गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटमुळे कुही व नरखेड तालुक्याला फटका बसला आहे. विशेषतः कुही तालुक्यात मिरचीच्या व गव्हाच्या शेतीची काही भागात नुकसान झालं आहे. नरखेड तालुक्यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या