JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'हा धृतराष्ट्र नाही तर...', फडणवीसांच्या 'खंजीर अन् बदला'वर ठाकरेंचा पलटवार

'हा धृतराष्ट्र नाही तर...', फडणवीसांच्या 'खंजीर अन् बदला'वर ठाकरेंचा पलटवार

उद्धव ठाकरेंनी आपल्या पाठीत खंजीर खुपसल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं, या वक्तव्यावर आता ठाकरेंनी पलटवार केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 नोव्हेंबर : मुख्यमंत्रीपदाचं कुठलंही आश्वासन दिलेलं नसताना शिवसेनेने 2019 साली माझ्या आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याचा बदला आम्ही घेतला, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. फडणवीस यांच्या या विधानावर उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला आहे. ‘आता परत, जाऊ द्या हो, आता तर लोकांसमोर हे सगळं घडलं आहे. मी मागे एकदा बोललो होतो. हा दृष्टीहीन धृतराष्ट्र नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे कुणी काय बोलतं, हे अवघा महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहतोय’, असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यामागे कोणाचा हात? फडणवीसांनी दिलं उत्तर काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस ‘उद्धव ठाकरेंनी भाजप आणि माझ्या पाठीत खंजीर खुपसला. आम्ही पुन्हा यायची संधी शोधतच होतो. आम्ही इकडे तपश्चर्या करण्यासाठी आणि साधू संत होण्यासाठी आलेलो नाही. आम्ही राजकीय नेते आहोत. आमच्यासोबत झालेल्या बेईमानीचे उत्तर आम्ही देणारच,’ असं फडणवीस म्हणाले. ‘याचं श्रेय उद्धव ठाकरेंना द्यावं लागेल, त्यांचा एकनाथ शिंदेंसोबत जसा व्यवहार होता, त्यामुळे त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कोण बाहेर पडत असेल तर आम्ही नको तुम्ही पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत बसा, असं आम्ही म्हणणार नाही. बाहेर पडलात, फार छान, आम्हालाही बदला घ्यायचा आहे, आम्ही असंच म्हणणार ना. मला या गोष्टीचा आनंद आहे. जी बेईमानी माझ्यासोबत झाली होती, त्याचा बदला घेतला,’ अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या