JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंबई जवळील ‘या’ शहराला USA का म्हणतात? कारण वाचून तुम्ही कराल मान्य, VIDEO

मुंबई जवळील ‘या’ शहराला USA का म्हणतात? कारण वाचून तुम्ही कराल मान्य, VIDEO

मुंबईजवळच्या एका शहराला देखील USA म्हणतात. हे शहर कुठं आहे? तसंच याला USA का म्हणतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी उल्हासनगर , 19 मे :  अमेरिका हा जगातील सर्वात प्रगत देश आहे. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचं सर्वांनाच आकर्षण असते. अमेरिकेतून राहून परतलेल्या व्यक्तीचंही आपल्याला कौतुक असतं. पण, त्याचवेळी आपल्या महाराष्ट्रात आणि ते देखील ठाणे जिल्ह्यातही युएसए आहे हे तुम्हाला माहिती आहे का? ठाणे जिल्ह्यातील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून उल्हासनगर प्रसिद्ध आहे. येथील स्वस्त कपडे आणि फर्निचरची बाजारपेठही चांगली फेमस आहे. याच उल्हासनगरला युएसए असंही म्हंटलं जातं. या शहराचं युएसए हे नाव हा पडलं याचं एक कारण आहे.

का म्हणतात युएसए? ‘देशाच्या फाळणीनंतर सिंध प्रातांतून विस्थापित झालेला सिंधी समाज हा उल्हासनगरमध्ये राहायला आला. सिंधी नागरिक इथं राहायला आले तेव्हा हा परिसर संपूर्ण जंगल होता. सुरुवातीला घरगुती मसाले, घरगुती वस्तू यांची विक्री करणाऱ्या या समाजानं अत्यंत कष्टानं स्वत:ची प्रगती केली. त्यामधूनच उल्हासनगरचाही लौकीक वाढला,’ अशी माहिती महाराष्ट्र सिंध असोसिएशनचे अध्यक्ष कमलेश सुखरमानी यांनी दिली. ‘उल्हासनगरमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंची विक्री ही संपूर्ण जगभर होते. येथील उल्हासनगर सिंध असोसिएशन या संस्थेचा शॉर्टफॉर्म हा यूएसए असा होतो. त्यामुळेच उल्हासनगरलाही युएसए असं म्हटलं जातं,’ असं सुखरमानी यांनी स्पष्ट केले. 3 महिन्यांची गरोदर अन् पतीचे निधन, धुणी भांडी केली आज अग्निशमन दलात आहे मोहिनी! Video परदेशी नागरिकांकडून आक्षेप? उल्हासनगरमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंवर मेड इन यु.एस.ए. असं लिहिलं जातं. त्या वस्तूंची जगभर निर्यात होते. त्यावेळी काही परदेशी नागरिकांनी याबाबत विचारपूस केली. पण त्यांना या यूएसएचा अर्थ ‘उल्हासनगर सिंध असोसिएशन’ आहे, असं समजल्यानंतर त्यांनी हा मुद्दा हसण्यावरी नेला. या प्रकरणात कोणताही कायदेशीर वाद झालेला नाही. वाद झाला ही अफवा आहे, अशी माहितीही सुखरमानी यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या