ठाणे, 24 जुलै : महिलांचा कुठलाही लुक हा त्यांच्या हातातल्या हॅण्डबॅग शिवाय पूर्ण होत नाही. आपल्या कपड्यांना साजेशी अशी हॅण्डबॅग ही महिलांच्या लुकला आणखीच आकर्षित बनवते. गरजेच्या लागनाऱ्या वस्तू हातात न पकडता ते एका सुंदर बागमध्ये व्यवस्थित ठेवण्यासाठी महिला या हॅण्डबॅगला प्राधान्य देतात. वस्तूंप्रमाणे बॅगचे लहान मोठे प्रकार आपल्याला मार्केटमध्ये सहसा उपलब्ध होतात. ठाण्याच्या राम मारुती रोडवरही आता लेडीजच्या ट्रेण्डी हॅण्डबॅग स्वस्त दरात मिळत आहेत.
ठाण्याच्या राम मारुती रोड परिसरात असलेला स्टॉल वर ट्रेण्डी प्रकारचे हॅण्डबॅग स्वस्थ दरात मिळत आहेत. या स्टॉलचे मालक प्रिन्स मिश्रा आहेत. येथे मिळणारे बॅग ह्या फक्त 250 रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करू शकतात. या स्टॉलचे मालक प्रिन्स मिश्रा हे गेले तीन ते चार वर्षांपासून ट्रेण्डी हॅण्डबॅग स्वस्त दरात विकत आहेत.
250 रुपयांचा हॅण्डबॅगचे वैशिष्ट्य? महिलांसाठी हॅण्डबॅग ही अगदी महत्त्वाची वस्तू आहे. कारण वापरात येणाऱ्या लहान मोठ्या गोष्टी त्याचप्रमाणे महत्त्वाचे कागदपत्र महिला या त्यांच्या रोजच्या हॅण्डबॅगमध्ये सांभाळून ठेवतात. 250 रुपयात मिळणाऱ्या या बॅग सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. विविध व्हरायटी बरोबरच वेगवेगळ्या रंगाचे कलेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल.
रंग बदलणारी, उलट उघडणारी छत्री पाहिलीत का? यंदा काय आहे छत्री बाजारचा ट्रेंडकोणत्या बॅग मिळतात? महिला त्यांच्या आवडीनुसार आणि त्यांनी घातलेल्या कपड्यानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग खरेदी करण्यास प्राधान्य देतात. त्याचप्रमाणे सध्या फॅशनमध्ये ट्रेण्ड काय सुरू आहे यावर त्यांचे विशेष लक्ष असते. राम मारुती रोडवरील या बॅगस्टॉलवर अनेक ट्रेण्डिंग आणि ब्रॅंडेड बॅग मिळतील. या ठिकाणी महिलांसाठी वॉटरप्रूफ बॅग, टोट बॅग, क्लच, सैडल क्रॉस बॉडी बॅग, बॅग पॅक, पर्स, बॅरल बॅग, बेल्ट बॅग, फॅन्सी बॅग, स्मॉल सुटकेस बॅग या ठिकाणी फक्त 250 रुपयात उपलब्ध होतील, अशी माहिती स्टॉलचे मालक प्रिन्स मिश्रा यांनी दिली आहे.