JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Thane News : 25 पैशांना विकत होते वडापाव, आजही दुकानातून कुणी जात नाही उपाशी, VIDEO पाहून कराल कौतुक

Thane News : 25 पैशांना विकत होते वडापाव, आजही दुकानातून कुणी जात नाही उपाशी, VIDEO पाहून कराल कौतुक

या वडापावनं महागाईच्या जमान्यातही गेल्या 40 वर्षांपासूनची आपली परंपरा जपली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लतिका अमोल तेजाळे, प्रतिनिधी  ठाणे, 6 जून : महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीमधील पदार्थांमध्ये आता वडापावनंही महत्त्वाचं स्थान पटकावलं आहे. मुंबईकरांचे आवडते असे हे फास्ट फुड आता राज्यातील सर्वच शहरात मिळते. प्रत्येक शहरात किमान एक खास वडापावचे सेंटर नक्की असते. या ठिकाणी वडापाव खाण्यासाठी नेहमी गर्दी होत असते. ठाण्यात तर वडापावचे अनेक सेंटर फेमस आहेत. या वडापावच्या गर्दीमध्ये न्यू इंग्लिश स्कूल जवळच्या राजमाता वडापाव सेंटरने एक वैशिष्ट्य जपले आहे. या वडापावनं महागाईच्या जमान्यातही गेल्या 40 वर्षांपासूनची आपली परंपरा जपली आहे. काय जपली परंपरा?  1983 साली न्यू इंग्लिश स्कूल जवळ राजमाता वडापाव सेंटरची सुरुवात झाली. राजमाता वडापाव सेंटर याचे मालक सदानंद शेट्टी यांनी सुरुवातीला 25 पैशांपासून वडापाव आणि भजी विकायला सुरुवात केली. हे राजमाता वडापाव सेंटर न्यू इंग्लिश स्कूल, ठाणे या शाळेच्या जवळ असल्यामुळे येथे भरपूर प्रमाणात शाळकरू विद्यार्थ्यांची रहदारी असते.

त्यामुळे सदानंद शेट्टी यांनी त्यावेळी शाळकरू विद्यार्थांना ज्यांच्याकडे पैसे नाहीत पण भूक मात्र लागली आहे. अशांना त्यांची पोट भरली पाहिजे या उद्देशाने असतील नसतील तेवढ्या पैशात वडापाव द्यायला सुरुवात केली होती. अगदीच पैसे नसतील तर फ्री वडापाव ही ते देत होते. तीच परंपरा त्यांनी कायम ठेवली असून ते आज गरजू विद्यार्थ्यांना फ्री वडापाव देतात.   दुकानातून उपाशी पोटी जाऊ नये वाढती महागाई लक्षात घेता, अन्न धान्याची आयात निर्यात करण्यासाठी लागणाऱ्या वाहतूक खर्चात झालेली वाढ, मजुरांचा तुटवडा आणि बदलत्या हवामानाचा पीक उत्पादनावर होणारा परिणाम यासारख्या विविध कारणांमुळे भारतातील खाद्य उद्योगातील महागाई सध्या वाढत आहे. या आव्हानांमुळे देशभरात खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्या आहेत.

नारळ पाणी नाही, तर क्रीम ज्यूस! तुम्ही कधी प्यायला का असं काही? पाहा VIDEO

संबंधित बातम्या

यासारख्या आव्हानांना डावलून आणि व्यापारात होत असलेल्या थोड्या फार तोट्याकडे नजरंदाज करुन फक्त ग्राहकांच्या समाधानासाठी शाळकरू विद्यार्थीच नव्हे, तर दिवसभर दगदग करून संध्याकाळी नाश्ता करायला आलेल्या रिक्षा चालकाचे पोट भरावे म्हणून त्यांना ही एका वडापाव सोबत आम्ही 2-4 भजी जास्त देतो. आमचा या मागे एकच उद्देश आहे कोणीही दुकानातून उपाशी पोटी जाऊ नये,असं निलेश शेट्टी यांनी सांगितले. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या