डोंबिवली, 19 जुलै : मुंबई आणि परिसरात सुरु असलेल्या पावसाचा जोर बुधवारी (19 जुलै) चांगलाच वाढलाय. ठाणे जिल्ह्यातली पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. या पावसामुळे नेहमी गजबजलेला असलेला डोंबिवली स्टेशन परिसर पाण्याखाली गेला होता. या भागात नेहमी फेरीवाल्यांचं राज्य असतं. पण, पावसामुळं इथं सर्वत्र पाणीच पाणी साचलं होतं. डोंबिवलीत अनेक ठिकाणी मोठी झाडं कोसळून पडली. तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला. सकाळपासून सुरू असलेल्या या पावसामुळे स्टेशन परिसरातल्या दुकानातही पाणी शिरले. त्यामुळे दुकानदार आणि तिथं खरेदीसाठी आलेल्या डोंबिवलीकरांचीही तारांबळ उडाली. डोंबिवलीमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
उल्हासनगरमध्ये धुमशान उल्हासनगरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे वालधुनी नदी आणि उल्हास नदीच्या पण्याची पातळी वाढली आहे. आजूबाजूच्या घरात पाणी घुसलंय. शहरातल्या सीएचएम कॉलेजजवळही पाणी साचलंय. या कॉलेजकडं जाणाऱ्या पुलाच्या रस्त्यावर पाणी साचलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा घरचा रस्ता पकडावा लागला. उल्हास नदीच्या पातळीत वाढ झाल्यानं आजूबाजूच्या चाळीतील घरातही पाणी शिरलंय. उल्हासनगरमध्ये पावसाचं धुमशान, पाहा स्टेशनबाहेरची भयानक दृश्य VIDEO अंबरनाथ बदलापूर रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं होतं. रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. बदलापूरहून सीएसएमटीच्या दिशेनं वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे पनवेल ते बेलापूर मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.