JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Dombivli News : आई धुणी भांडी करते तर वडील रिक्षा चालवतात, शारीरिक व्यंगावर मात करत ऋषिकेशनं मिळवलं दहावीत यश, Video

Dombivli News : आई धुणी भांडी करते तर वडील रिक्षा चालवतात, शारीरिक व्यंगावर मात करत ऋषिकेशनं मिळवलं दहावीत यश, Video

घरची गरिबी, शारीरिक व्यंग या सर्व गोष्टींवर मात करत डोंबिवलीतील ऋषिकेशने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय. ऋषिकेशला मिळालेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी डोंबिवली, 6 जून : दहावीचा निकाल हा नुकताच जाहीर झालाय. अनेक विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण प्राप्त केले असून काही विद्यार्थ्यांनी घरच्या अतिशय साधारण परिस्थितीतून प्राविण्य प्राप्त केले आहे.  डोंबिवलीच्या  ऋषिकेश मोरे याने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. घरची गरिबी, शारीरिक व्यंग या सर्व गोष्टींवर मात करत ऋषिकेश मोरेने दहावीच्या परीक्षेत 86 टक्के गुण प्राप्त केले आहेत. ऋषिकेश डोंबिवलीतील शेलार नाका येथील झोपडपट्टीमध्ये राहतो. ऋषिकेशची आई धुणी भांडी करते तर वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ऋषिकेशला लहानपणापासून दृष्टी नव्हती. सुरुवातीला तर त्याला काहीच दिसत नव्हते. त्यानंतर जसा मोठा होत गेला तसे हळू हळू दिसू लागले. सध्या ऋषिकेश पार्शली ब्लाइंड असून तो डोंबिवलीतील जोशी शाळेत शिकत होता.

घरी घेतला अभ्यास सुरुवातीला मी एका दुकानात कामाला होते त्यानंतर ऋषिकेशचा जन्म झाला तेव्हा ऋषिकेशला डोळ्यांनी दिसत नसल्याचे लक्षात आले. मी दुकानातील नोकरी सोडली आणि धूण्या भांड्यांची कामे करू लागले. जेणेकरून मी ऋषिकेशवर लक्ष ठेवू शकते अशी जवळपासची कामे करण्यास सुरुवात केली. दुपारी दोन वाजता घरी आल्यानंतर मी स्वतः ऋषिकेचा अभ्यास घेत होते. कारण परिस्थिती नसल्याने त्याला शिकवणी लावणे ही शक्य नव्हते, असं ऋषिकेशची आई उषा मोरे यांनी सांगितले. निकालानंतर काय वाटलं? शाळेत सोडणे आणि शाळेतून घरी घेऊन येणे हे काम माझे होते. ऋषिकेशला दिसत नाही त्याचबरोबर घरची परिस्थिती बेताची आहे तरी देखील ऋषिकेशने चांगले टक्के मिळवल्याने मला खूप आनंद होत आहे,अशी भावना ऋषिकेशचे वडील प्रवीण मोरे यांनी व्यक्त केली.

Dombivli News : ‘बाबा डोंबिवलीत रिक्षा चालवतात, त्यांना IAS होऊन दाखवणार’ श्रावणीचं यश पाहून सगळेच भारावले

संबंधित बातम्या

अशा मुलांना घरी बसवू नये काही ना काही तरी शिकवत राहावे. त्यांच्या बुद्धीला चालना मिळेल असे अशी कोणतीही ऍक्टिव्हिटी त्यांच्याकडून करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा मुलांकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये असा संदेश ऋषिकेशची आई उषा मोरे यांनी दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या