JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / चांद्रयान 3 मोहिमेमध्ये डोंबिवलीचाही सहभाग, अशी बजावली भूमिका

चांद्रयान 3 मोहिमेमध्ये डोंबिवलीचाही सहभाग, अशी बजावली भूमिका

भारतीय अवकाश संशोधन (इस्रो)च्या चांद्रयान-3 मोहिमेत डोंबिवलीचंही महत्त्वाचं योगदान आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

डोंबिवली,  18 जुलै 2023 :   भारताच्या चांद्रयानाने अवकाशात झेप घेतली हा क्षण देशातील प्रत्येक नागरिकानं काही दिवसांपूर्वी मोठ्या अभिमानानं पाहिला. चंद्रयान 3 ऑगस्ट मध्ये चंद्रावर उतरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत या अभियानांतर्गत हे चांद्रयान बनवण्यात आले आहे. देशातील अनेक कंपन्यांचा या निर्मितीमध्ये सहभाग आहे. चांद्रयानाचे इंजिन मुंबईतील कंपनीत बनवण्यात आलं होतं. त्याचबरोबर डोंबिवलीतल्या एका कंपनीमध्येही यानाचे काही पार्ट्स बनवण्यात आले आहेत. डोंबिवली ते चांद्रयान- 3 डोंबिवलीच्या ड्राय ऑल या कंपनीनं चंद्रयान कंपनीचे काही पार्ट्स बनवले आहेत. एका मोठ्या कंपनीचा चांद्रयान 3 च्या निर्मतीमध्ये सहभाग होता. या कंपनीला छोटे पार्ट्स पुरवण्याचं काम आम्ही केलंय. चांद्रयान 3 मध्ये ॲक्यूमलेटर, रिसीव्हर हे छोटे पार्ट्स वापरले आहेत.

मशीनचे तापमान योग्य प्रमाणात राहावे यासाठी हे पार्टस वापरले जातात अशी माहिती कंपनीचे संचालक विकास आणि आकाश सेखानी यांनी दिली. चांद्रयानामध्ये हे पार्ट्स वापरण्यात आले असून ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. कसा असेल चांद्रयान-3 चा प्रवास? सविस्तर माहिती सोप्या शब्दांत वातानुकूलित आणि रेफ्रिजरेशन प्रणाली (सिस्टिम) साठी वेगवेगळे पार्टस तयार करते. या पार्टस मध्ये फिल्टर ड्रायर, ॲक्यूमलेटर, ऑईल सेप्रेटर, लिक्वीड रेफ्रीजरेंट रीसिव्हर असे विविध व्हेसल्स, हीट एक्सेंजर आणि इतर पार्टस तयार होतात. जगभरात या पार्ट्सना मागणी आहे, असं कंपनीचे मॅनेजर शार्दुल वडनेरकर यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या