नितीन नांदुरकर, जळगाव 03 नोव्हेंबर : आमदार चिमणराव पाटील यांच्या मतदारसंघातील एरंडोल येथे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन सभा झाली. जळगावात बोलताना त्यांनी भाजप आणि गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. कोरोना काळात गुलाबराव पाटील यांच्या कारकीर्दीत व्हेंटिलेटरचा घोटाळा झाल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. मात्र, भाजपच्या लोकांचा किंवा भाजपचे निकटवर्तीय असलेल्या लोकांचा घोटाळा निघाला तर किरीट सोमय्या काहीही बोलत नाहीत. तर, इतरांबद्दल तोच विषय ओढून ताणून आणला जातो, असा आरोपही त्यांनी केला. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या आदेशाची पायमल्ली? जळगावातील सभेत ‘धनुष्यबाणाचा’ वापर सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, की बीकेसी मेळाव्यासाठी तुम्ही दहा कोटी खर्च केले. एखादा पक्ष रजिस्टर नसतानासुद्धा ते पैसे कुठून खर्च केले? कोणाच्या खात्यातून खर्च केले? असे अनेक प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले. भावना गवळी, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव यांना ईडीच्या नोटिसा दिल्या आणि चौकशा सुरू झाल्या. मात्र त्या चौकशा अचानक कशा थांबल्या? असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. भाजपाकडे असा कोणता अलादीनचा चिराग आहे, की जो घासला आणि नाव घेतलं की सर्व आरोप गायब होवून जातात, असं म्हणत त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. त्या पुढे म्हणाल्या, ‘कालपर्यंत माफिया वाटणाऱ्या भावना गवळी आता मोदीजींना राखी बांधू शकतात. ज्या यशवंत जाधव यांच्या घरात दोन कोटींचं घड्याळ सापडलं. बेनामी बेहिशोबी मालमत्ता सापडल्याचे किरीट सोमय्या म्हणत होते. मात्र, नंतर सगळं शांत झालं.’ महिला पत्रकाराला दिलेल्या उत्तरामुळे संभाजी भिडे अडचणीत, महिला आयोगाची नोटीस आधी मानसिक खच्चीकरण करायचं मग त्याला आपल्याकडे ओढायचं आणि सर्व आरोप विसरून जायचे. भाजपा, किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीस यांना असं वाटत असेल की आपण जे करतोय हे फार अक्कल आणि हुशारीने करतोय. हे लोकांच्या लक्षात येत नाहीये, असं त्यांना वाटत असेल तर हा त्यांचा फार मोठा गैरसमज आहे. ये पब्लिक है सब कुछ जानती है, असा थेट निशाणाही सुषमा अंधारे यांनी साधला आहे.