JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मध्यावधी निवडणुका होणार का?, सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं; मुबई महापालिका निवडणुकीबाबतही मोठा दावा

मध्यावधी निवडणुका होणार का?, सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं; मुबई महापालिका निवडणुकीबाबतही मोठा दावा

सत्ताधारी पक्षातील आमदार नाराज असून, मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असा दावा वारंवार करण्यात येत आहे. यावर आता सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात

सुधीर मुनगंटीवार

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 नोव्हेंबर :  सत्ताधारी पक्षातील आमदार नाराज असून, मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असा दावा वारंवार करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मध्यावधी निवडणुकांबाबत वक्तव्य केलं होतं. साजय राऊत  यांच्याप्रमाणेच विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी देखील  मध्यावधी निवडणुका होऊ शकतात असं म्हटलं होतं. आता विरोधकांच्या या दाव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे कार्यकर्ते शिंदे गटात सामील होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांना थांबवण्यासाठी  मध्यावधी निवडणुकांचे लॉलीपॉप दिले जात असल्याचा खोचक टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे. संजय राऊतांवर निशाणा   याचबरोबर  त्यांनी संजय राऊत यांच्या सेक्युरिटीबाबत देखील प्रतिक्रिया दिली आहे. अति महत्त्वाच्या व्यक्तीची सिक्युरिटी ही रिव्हिव कमिटी ठरवत असते. त्यात राज्य सरकारचा कोणताही संबंध  नसतो. आता संजय राऊत ओरड करत आहे, मात्र जेव्हा आमची सेक्युरिटी काढली तेव्हा हेच आम्हाला सामान्य ज्ञान देत होते. आता त्यांनी इतरांना सामान्य ज्ञान द्यावे असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. हेही वाचा :   कर्नाटक सरकारची महाराष्ट्राच्या जमिनीवर नजर, सांगलीतील गावांवर सांगितला दावा …ही तर नेहरूंची देण दरम्यान त्यांनी यावेळी कर्नाटक सीमावादावरून पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधाला आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद ही पंडित जवाहरालाल नेहरू यांची देण आहे. मात्र सीमावाद प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. त्यामुळे कोणत्याही ग्रामपंचायतने जरी ठराव केला असला तरी काहीही फरक पडणार नाही. निर्णय सर्वोच्च न्यायालय देणार आहे. कर्नाटक मधील अनेक ग्रामपंचायती आहेत, ज्यांना महाराष्ट्रात यायचं आहे. मग त्यांचं काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. हेही वाचा :      ‘चावट’, बोलीभाषा अन् वाद, एकनाथ खडसेंवर माफी मागायची वेळ महापालिकेवर भाजपचीच सत्ता  आदित्य ठाकरे हे आज बिहार दौऱ्यावर आहेत. यावरून त्यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे यांनी बिहार उत्तर प्रदेश, गुजरात कोठेही दौरा केला तरीही मुंबई महानगरपालिकेवर भाजप व शिंदे गटाचीच सत्ता येईल असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या