JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आयुष्य सगळ्यात मोठी परीक्षा बघत असतानाच मुलाने दिला दहावीचा पेपर, चोपड्याची हृदयद्रावक घटना

आयुष्य सगळ्यात मोठी परीक्षा बघत असतानाच मुलाने दिला दहावीचा पेपर, चोपड्याची हृदयद्रावक घटना

वडिलांचा मृतदेह घरात असतानाही मुलाने दहावीचा पेपर लिहिल्याची हृदयद्रावक घटना चोपड्यामध्ये घडली आहे.

जाहिरात

वडिलांच्या निधनानंतरही दिली दहावीची परीक्षा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इम्तियाज अहमद, प्रतिनिधी चोपडा, 17 मार्च : वडिलांचा मृतदेह घरात असतानाही मुलाने दहावीचा पेपर लिहिल्याची हृदयद्रावक घटना चोपड्यामध्ये घडली आहे. चहार्डी तालुक्यातील घाडवेल रस्त्यालगत असलेल्या वस्तीमध्ये गणेश मोहन मोहिते राहत होते, पण त्यांचं अचानक निधन झालं. मृतदेह घरात असताना त्यांचा मुलगा यश गणेश मोहिते याने दहावीच्या विज्ञानाचा पेपर लिहिला. यश हार्डीमधल्या स्व. श्यामराव शिवराम पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात शिकत आहे. वडिलांची अंत्ययात्रा दुपारी असल्यामुळे तसंच मुलाचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी यशला दहावीच्या पेपरला बसण्याचा सल्ला दिला. एवढच नाही तर शिक्षक यशला घेऊन मोटरसायकलने शाळेत घेऊन आले आणि त्याला पेपर लिहिण्यासाठी वर्गात बसवलं. यशनेही मोठं दु:ख मनात ठेवून विज्ञानाचा पेपर लिहिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या