JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'तो' उपाय अन् शेतात चित्रच बदललं,एका एकरात घेतलं पपईचं 50 टन उत्पादन, Video

'तो' उपाय अन् शेतात चित्रच बदललं,एका एकरात घेतलं पपईचं 50 टन उत्पादन, Video

Success Story : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यानं एका एकरात तब्बल 50 टन पपईचं उत्पादन घेतलंय. त्याला हे कसं शक्य झालं? पाहूया

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर 6 मे : शेत जमिनीचा योग्य वापर करुन जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करत असतात. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रीय पद्धतीचे खतं वापरून मोठा नफा कमावलाय. शास्त्रज्ञ डॉ. सलीम चन्नीवाला यांनी केलेल्या संशोधनातून गहू आणि केळी या पिकांवर या खतांचा अनुकूल परिणाम झाला आहे. त्याचबरोबर या संशोधनाचा आता पपई उत्पादनावरही अनुकूल परिणाम होतोय. कसा झाला फायदा? माळशिरस तालुक्यातल्या संजय वाघमोडे यांनी अडीच एकरामध्ये 15 नंबरच्या पपईची लागवड केली आहे. जैनम चरखा हे सेंद्रीय खत त्यांनी सुरुवातीपासूनच या पपईला दिले.  त्यांच्या शेतातील पपईच्या पिकातील अंतर हे आठ बाय सहा इतके असून एका झाडाला 40 ते 50 किलो  पपई आली आहे.

एक एकरामध्ये साधारणपणे एक हजार रोपांची संख्या असते. त्यानुसार एक एकरामध्ये साधारण 50 टन पपई घेतली आहे. मी आजवर घेतलेलं हे सर्वाधिक उत्पादन असल्याची भावना वाघमोडे यांनी व्यक्त केली. सोलापूरची पाव चटणी लय फेमस, 61 वर्षांपासून टेस्ट जशीच्या तशीच, पाहा VIDEO माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात मी एवढे पपई उत्पादन कधीच पाहिले नाही. सेंद्रिय स्वरूपातील खतांच्यामुळे माझ्या जमिनीचा कस देखील वाढल्याचे माझ्या निदर्शनास पडत आहे. आता हार्वेस्टिंग चालू केले असून पपईची कॉलिटी ही सर्वोत्तम निघाली असून बाजारात याला विक्रमी भाव मिळेल अशी मला खात्री आहे, असा विश्वास वाघमोडे यांनी यावेळी व्यक्त केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या