JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Solapur News : मुंबई-सोलापूर 'वंदे भारत' महाराष्ट्रात हिट, पाहा काय सांगते आकडेवारी Video

Solapur News : मुंबई-सोलापूर 'वंदे भारत' महाराष्ट्रात हिट, पाहा काय सांगते आकडेवारी Video

मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस महाराष्ट्रात सर्वात जास्त हिट ठरली आहे. पाहा आकडेवारी काय सांगते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर 29 मे : सोलापूर रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई यांच्यात फेब्रुवारी महिन्यात मोठ्या दिमाखात वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली होती. सोलापूरकरांचा मुंबईपर्यंतचा प्रवास जलद व्हावी हा या गाडीचा उद्देश होता. परंतु नागरिकांमध्ये या गाडीची क्रेझ कायम टिकून राहील का नाही अशी शंका वाटत होती. परंतु हीच गाडी महाराष्ट्रात सर्वात जास्त हिट ठरली आहे. महाराष्ट्रातील वंदे भारत एक्स्प्रेसच्या तुलनेत सोलापूरच्या वंदे भारत एक्स्प्रेसने सर्वात जास्त प्रवाशांनी प्रवास केल्याची आकडेवारी समोर आली आहे.   हायटेक सुविधा वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांना विमानासारख्या प्रवासाचा अनुभव प्रदान करते शिवाय कवच या तंत्रज्ञानासह प्रगत अध्याधुनिक सुरक्षा आणि वैशिष्ट्ये असलेल्या असंख्य सुविधाही पुरवते. वातानुकूलित नियंत्रण आणि उच्च कार्यक्षमतेच्या विविध मशीन्स वापरून व्याक्युम टॉयलेट, इलेक्ट्रिकल क्युबिकल्स, फायर डिटेक्शन, अंध व्यक्तीला प्रवासादरम्यान त्यांना त्यांचे आसन क्रमांक कळावे यासाठी ब्रेल लिपीत असन हँडलही देण्यात आले आहेत. अशा अनेक फीचर्स यावेळी प्रवाशांना देण्यात आल्या आहेत.

काय सांगते आकडेवारी -सिंगल रेख असणारी सोलापूर ते मुंबई आणि मुंबई ते सोलापूर अशी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन फेब्रुवारीमध्ये सुरू झाली. -फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे अखेरपर्यंत मुंबई ते सोलापूर या गाडीला अनुक्रमे 81.32%, 79.59%, 87.42%, 119.45% इतक्या एक्यूपंसीने म्हणजेच गाडीच्या एकूण क्षमतेच्या इतक्या लोकांनी प्रवास केला आहे. - तर सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस या गाडीला फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, आणि मे अखेरमध्ये 90.34%,78.48%,88.77%,125.23% गाडीच्या क्षमतेच्या इतके टक्के प्रवाशांनी प्रवास केला आहे. - या दोन्ही वंदे भारत एक्स्प्रेस पाठोपाठ शिर्डी साईनगर ते मुंबई आणि बिलासपूर ते नागपूर या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा समावेश आहे. - मुंबई ते सोलापूर या वंदे भारत एक्स्प्रेससाठी सर्वाधिक क्षमतेने प्रवास हा 12 मे रोजी झाला असून 133.06% इतक्या प्रवाशांनी प्रवास केल्याची सर्वाधिक नोंद झाली आहे. -तर त्या पाठोपाठ सोलापूर ते मुंबई या वंदे भारत एक्स्प्रेससाठी सर्वाधिक क्षमतेने प्रवास हा दोन मे रोजी झाला असून 151.24% इतक्या प्रवाशांनी प्रवास केल्याची सर्वाधिक नोंद झाली आहे.

Solapur News : प्री वेडिंग शूटवर बंदी घालण्याचा मराठा संघटनेचा निर्णय, पाहा काय दिलं कारण, Video

संबंधित बातम्या

वंदे भारतला पसंती  सोलापूर विभागातील सर्व संलग्नित स्टाफचे हे यश असून ही खरच आनंदाची गोष्ट आहे. शिवाय प्रोव्हाइड करण्यात आलेली सर्विस ही याचे मुख्य कारण आहे. पूर्वी सोलापूरहून मुंबईला जाण्यासाठी बाय रोडने जाणे अनेक जण पसंत करत होते. परंतु हा आरामदायी प्रवास असल्याने वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करणे प्रवासी पसंत करीत आहेत. या गाडीची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघण्याची वेळ ही दुपारी चारची असल्याने फार जणांनी यासंदर्भात निवेदन दिले की गाडीची वेळ ही उशिरा ठेवावी. परंतु मुंबईसारख्या शहरात सायंकाळी पाच वाजल्यानंतर लोकलच्या मोठ्या फेऱ्यांचे नियोजन मागील अनेक वर्षांपासून व्यवस्थितपणे करण्यात आले आहे. जर ही गाडी दुपारी चार वाजल्यानंतर सोलापूरसाठी निघत असेल तर संपूर्ण रेल्वे प्रशासनाच्या लोकल फेऱ्यांचा नियोजन बिघडेल त्यामुळे या गाडीचे वेळ बदलण्यात येणार नसल्याचे यापूर्वीही रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक सोलापूर निरजकुमार डोहारे यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या