JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महाराष्ट्रात मंदीची लाट, हजारो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड

महाराष्ट्रात मंदीची लाट, हजारो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड

महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्रा आणि बॉश या आटोमोबाईल उद्योग क्षेत्रातील नामांकित कंपन्या मंदीच्या गर्तेत आहेत. याचा फटका कामगार क्षेत्राला बसतोय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लक्ष्मण घाटोळ, नाशिक 31 जुलै : कोलमडलेली ग्रामीण अर्थव्यवस्था आणि वाढती बेरोजगारी यामुळं आलेल्या आर्थिक मंदीचा फटका वाहन उद्योगासह लघुउद्योगांनाही बसत असल्याचं समोर आलंय. उत्तर महाराष्ट्रातील अनेक मोठया कंपन्यांना तर इन आऊट करण्याची वेळ आलीय. तर काहीनी नो प्रोडक्शन डे जाहीर करत कंपन्यांच बंद ठेवल्याय. त्यामुळे वाहन उद्योग संकटात सापडला असून कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळ्याची शक्यता आहे. होय, खेकडे धरण फोडू शकतात - आदित्य ठाकरे नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्रा आणि बॉश या आटोमोबाईल उद्योग क्षेत्रातील नामांकित कंपन्या मंदीच्या गर्तेत आहेत. याचा फटका नाशिकच्या उद्योग क्षेत्राला बसतोय. बॉश कंपनीने गेल्या महीन्यात संपूर्ण एक आठवडा तर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आठवड्यातील तीन दिवस काम बंद ठेवत ज्या विभागात कामाची गरज आहे त्याच कामगारांना कामासाठी बोलविण्याचा निर्णय घेतलाय. जागतिक मंदी आणि बी. एस. 6 ही केंद्र शासनाची नवी प्रणाली या मुळे ऑटोमोबाईल उद्योगावर परिणाम झाल्यानं कधी नव्हे असं उद्योग बंद ठेवन्याच संकट ओढवलं असल्याची प्रतिक्रिया महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे जनरल मॅनेजर जितेंद्र कामतिकर यांनी दिलीय. हम साथ-साथ है! शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार, युतीचं सरकार आणणार-मुख्यमंत्री नाशिक मधील महिंद्रा एंड महिंद्रा आणि बॉश हे मोठे उद्योग संकटात सापडल्याने जिल्ह्यातील 500 पेक्षा जास्त लघु उद्योग आणि त्यावर अवलंबून असलेल्या 40 ते 50 हजार कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे. सरकारचे बदलते धोरण आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील जागतीक मंदीमुळे वाढत्या बेरोजगारीत या मंदिची भर पडण्याची शक्यता आहे. मेगाभरती! कोण-कोण झालं भाजपमध्ये सहभागी, पाहा हा VIDEO मोठ्या उद्योगांवर आलेल्या या संकटाचा परिणाम लघुउद्योगांवर आणि तेथे काम करणाऱ्या कामगारांना थेट होत असून गेल्या दोन महिन्यांपासून तो प्रखरतेने जाणवत आहे.केंद्र सरकारने 2030 पर्यन्त डिझेलवर चालणारी वाहने पूर्णपणे बंद करण्याचा घेतलेला निर्णय आणि जागतिक मंदी या दुहेरी संकटात सापडलेल्या ऑटोमोबाईल उद्योगावर ओढवलेल्या संकटावर केंद्र सरकारने वेळीच तोडगा न काढल्यास देशातील बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या