होय, खेकडे धरण फोडू शकतात - आदित्य ठाकरे

होय, खेकडे धरण फोडू शकतात - आदित्य ठाकरे

खेकडे धरण पोखरत असताना इंजिनिअर्स काय करत होते असा प्रश्न आता विचारण्यात येतोय.

  • Share this:

उदय जाधव, सोलापूर 31 जुलै :  मुसळधार पावसामुळे महिनाभरापूर्वी कोकणातलं तिवरे धरण फुटून खळबळ उडाली होती. त्यावरची चर्चा अजूनही संपत नाहीये. हे धरण कशामुळे फुटलं याचा अभ्यास सध्या सुरू आहे. मात्र त्यावरून झालेल्या राजकीय चर्चेने वादळ निर्माण झालं होतं. शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी हे धरण खेकड्यांमुळे पोखरलं गेलं आणि फुटलं असं मत व्यक्त केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही आज धरण पोखरण्याला आणि फुटण्याला खेकडे कसे कारणीभूत ठरतात हे एका विद्यार्थ्याला सप्रमाण पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे खेकडे आणि धरणफुटीची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.

आदित्य ठाकरे सध्या जनआशीर्वाद यात्रेच्या दौऱ्यावर आहे. हा त्यांच्या यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झालाय. यानिमित्त ते आज सोलापूरमध्ये होते.

हम साथ-साथ है! शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार, युतीचं सरकार आणणार-मुख्यमंत्री

खेकडे आणि धरण

या यात्रेदरम्यान ते समाजातल्या विविध घटकांशी 'आदित्य संवाद' हा कार्यक्रम करत आहेत. आज या कार्यक्रमात वालचंद कॉलेज मधील एका विद्यार्थ्याने फिरकी घेणारा प्रश्न विचारला. खेकड्यांमुळे धरण कसं फूटू शकतं...? असा त्याचा प्रश्न होता. त्यावेळी मंत्री तानाजी सावंत हेही मंचावर उपस्थित होते. त्यामुळे कार्यक्रमात उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आणि उत्सुकताही ताणली गेली. या प्रश्नावर आदित्य काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.  या प्रश्नांवर उत्तर देताना आदित्य यांनी इंजिनिअरींगचा हवाला दिला आणि खेकडे कसं धरण फोडण्याची शक्यता आहे याची शास्त्रीय कारणही दिलीत.

मेगाभरती! कोण-कोण झालं भाजपमध्ये सहभागी, पाहा हा VIDEO

नाशिकच्या मेरी या संस्थेने दिलेल्या अहवालातले निष्कर्षही त्यांनी सांगितले. त्यानुसार खेकड्यांची धरण पोखरण्याची क्षमता आहे आणि ते जमीन पोखरू शकतात असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे असंही त्यांनी उत्तर दिलं. सोशल मीडियावरही या प्रश्नांची आता चर्चा होतेय. खेकडे धरण पोखरत असताना इंजिनिअर्स काय करत होते असा प्रश्न आता विचारण्यात येतोय.

भाजप जोमात, विरोधक कोमात! शिवेंद्रसिंहराजेंसह आणखी 4 आमदारांच्या हाती कमळ

नेमकं काय झालं होतं?

तिवरे धरण 2 जुलैला मंगळवारी रात्री 8 ते 9 च्या सुमारास फुटले. धरणाच्या पायथ्याशी असलेली भेंडेवाडी वाहून गेली. बचाव पथकाला 19 मृतदेह शोधण्यात यश आलं होतं. काही मृतदेह बेपत्ता आहेत. ते सापडच नसल्याने आता शोधकार्य थांबविण्यात आलं. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस, जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान मध्यरात्रीच घटनास्थळी दाखल झाले होते. नदीच्या काठावरील 5 घरांचे मोठे नुकसान झालं होतं. चिपळूनसह परिसरातील जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे धरणाच्या भिंतींना तडे गेले आणि धरण फुटलं. धरण फुटल्यामुळे भेंडेवाडी (तिवरे गाव) या गावावर आस्मानी संकट कोसळलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 03:14 PM IST

ताज्या बातम्या