हम साथ-साथ है! शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार, युतीचं सरकार आणणार-मुख्यमंत्री

भाजप स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार, अशा जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय गोटात सुरू आहेत. या उलटसुलट चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2019 12:34 PM IST

हम साथ-साथ है! शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार, युतीचं सरकार आणणार-मुख्यमंत्री

मुंबई, 31 जुलै : आगामी विधानसभा निवडणुकीत बहुमताचा नवीन रेकॉर्ड करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पण भाजप  स्वबळावर निवडणूक लढवणार, अशा जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय गोटात सुरू आहेत. या उलटसुलट चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (31 जुलै) पूर्णविराम दिला आहे. विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि मित्रपक्षांसोबतच लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. गरवारे क्लब येथे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांचा भाजपप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

आमची युती अभेद्य - मुख्यमंत्री

युतीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 'भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आमचे मित्रपक्ष ही आमची युती अभेद्य आहे. आम्ही युतीसोबतच निवडणुका लढणार आहोत. स्वतंत्र लढायचं आहे, सर्वच्या सर्व जागांवर लढायचं आहेत, अशी कुठेही-कोणाचीही मागणी नाही. लोकसभा निवडणूक आम्ही एकत्रित लढलो, विधानसभा निवडणुकीतही आम्ही एकत्रच लढणार आहेत. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा युतीचंच सरकार आम्ही निश्चितपणं निवडून आणणार. राज्यात युतीचं सरकार येणार आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेनंही ठरवलं आहे. आता फक्त बहुमताचे कोणते रेकॉर्ड आम्ही तोडणार आहेत, हे पाहायचं आहे. युतीला मोठं जनसमर्थन मिळणार आहे. आम्ही विस्तृत प्रकारे जागांच्या संदर्भातील तडजोड केली आहे. यामध्ये काही जागांची अदलाबदलही होईल. याबाबत आगामी काही दिवसांमध्ये निर्णय होतील आणि युती निवडून येईल', असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

(वाचा : भाजप जोमात, विरोधक कोमात! शिवेंद्रसिंहराजेंसह आणखी 4 आमदारांच्या हाती कमळ)

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बुधवारी (31 जुलै) भाजपमध्ये मेगाभरती झाली. राष्ट्रवादी-काँग्रेस आणि काँग्रेसमधून आमदार, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड, काँग्रेसचे कालीदास कोळंबकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील गरवारे क्लब येथे हा भाजपप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. 'भाजप'वासी होण्यासाठी या सर्व आमदारांनी मंगळवारी (30 जुलै) विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. शिवेंद्रसिंहराजे साता-यातील जावळीचे, पिचड अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, कोळंबकर मुंबईतील वडाळा तसेच नाईक हे नवी मुंबईतील बेलापूरचे आमदार होते. एवढ्या मोठ्या संख्येनं आज भाजपमध्ये मेगाभरती झाल्यानं ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडल्याचं दिसत आहे. गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपप्रवेश केला. यावेळेस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आणि विनोद तावडे आदींसह भाजपाचे प्रमुख नेते हजर होते.

(ऐका : VIDEO: भाजपमध्ये इनकमिंग जोरात, मुख्यमंत्री म्हणतात; 'आम्ही खूप हुशार')

शिवेंद्रसिंहराजेंची 'ती' खंत

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानं पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. मतदारसंघात त्रास दिला जात असल्याची माहिती आपण पवार साहेबांनी दिली असल्याची खंत शिवेंद्रराजेंनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली होती.  तसंच मतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, शिवेंद्रसिंहराजे यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्यानंतर ते पक्ष सोडणार नसल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं. पण भाजप प्रवेश निश्चित करणार असल्याचं सांगत त्यांनी सर्व उलटसुलट चर्चांना पूर्णविराम दिला.

(पाहा :VIDEO: भाजप प्रवेश केल्यानंतर मधुकर पिचड यांची पहिली प्रतिक्रिया)

1.वैभव पिचडांचा राजकीय प्रवास

अहमदनगरच्या अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष

जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही नेमणूक

समाजकल्याण विभागाच्या सभापतीपदाची जबाबदारी सांभाळली आहे

अमृतसागर सहकारी दूध संघाचे चेअरमन म्हणूनही नियुक्ती

2014 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार

शेतकरी प्रश्नावरून विधानसभेत गोंधळ, बजेटची कॉपी जाळल्याप्रकरणी काही काळ निलंबित

2.कालिदास कोळंबकरांची राजकीय कारकीर्द

कालिदास कोळंबकर वडाळ्यातील काँग्रेस आमदार

यापूर्वी 5 पेक्षा जास्त वेळा विजय

पहिल्यांदा शिवसेना, नंतर राणेंसोबत 2005 मध्ये काँग्रेसमध्ये

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात पुन्हा विजयाचा झेंडा

2014 साली विधानसभेत अवघ्या 1 हजारपेक्षा कमी मतांनी काँग्रेसमधून विजयी

बीडीडी पुर्नवसन,पोलीस वसाहत पुर्नविकास प्रकल्पांमुळे मुख्यमंत्र्यांशी जवळीक

3.शिवेंद्रराजेंचा राजकीय प्रवास

साताऱ्याच्या जावळी मतदारसंघातून आमदार

सलग तीन वेळा विजयी

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी नियुक्त

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, मार्गदर्शक

सातारा कृषी समिती, जावळी पंचायत समितीचे संचालक

नगरविकास आघाडीचे संस्थापक

4. संदीप नाईकांचा राजकीय प्रवास

2005मध्ये नगरसेवक म्हणून राजकारणात प्रवेश

2007-08मध्ये नवी मुंबईच्या स्थायी समितीचे सभापती

नवी मुंबईचे महापौर होण्याचे स्वप्न भंगले

महत्वाकांक्षी तरुण नेते म्हणून ओळख

विरोधकांवर कायम वरचढ म्हणून ओळख

2 निवडणुकांमध्ये सेनेच्या विजय चौगुलेंचा केला पराभव

ऐरोलीतून 2009 मध्ये पहिल्यांदा आमदार

2014मध्ये ऐरोलीतून आमदार

5.चित्रा वाघ यांचा राजकीय प्रवास

- राष्ट्रवादी काँग्रेसमधील आक्रमक नेत्या म्हणून ओळख

- महिला आघाडीचं प्रदेशाध्यक्षपद भूषवलं

- 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला विरोधी पक्षाची भूमिका निभावली

- आक्रमक वक्तृत्वामुळे राज्यात त्यांची छाप

- महिला आघाडी सक्षम केली

मेगाभरती! कोण-कोण झालं भाजपमध्ये सहभागी, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 12:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...