JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी राज्यभरातील तरुणांना केलं खास आवाहन

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी राज्यभरातील तरुणांना केलं खास आवाहन

शिरूरचे (Shirur) खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शिवजयंतीनिमित्त एक खास आवाहन केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जुन्नर, 17 फेब्रुवारी : ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीला एक शाश्वत देणगी दिली ती म्हणजे स्वराज्य. शिवरायांची यंदा 391 वी जयंती आहे, यानिमित्ताने प्रत्येक गावात 291 झाडे लावू या आणि ती जगवू या. या मातीला शाश्वत देणं देण्याचा शिवरायांचा विचार जागवू या,’ असं आवाहन शिरूरचे (Shirur) खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केलं आहे. यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391 व्या जयंतीच्या निमित्ताने खासदार डॉ. कोल्हे यांनी वन उपविभाग, जुन्नर आणि पुरातन विभागाच्या सहकार्याने शिवनेरी गडावर 391 देशी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. याच संकल्पाची व्याप्ती वाढवत खासदार कोल्हे यांनी गावोगावच्या ग्रामपंचायतींना 391 देशी झाडे लावून ती वर्षभर जगविण्यासाठी नियोजन करण्याचं आवाहन केलं आहे. हेही वाचा - साहेब जमिनीवर कार्यकर्ते दिवाणावर; आमदार निवासातला फोटो पुन्हा VIRAL प्रत्येक गावात 391 देशी वृक्ष लावण्याच्या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेनेही सहकार्य केले असून ही झाडे लावण्यासाठी मनरेगा योजनेंतर्गत कार्यक्रम राबविण्याचे आवाहनही ग्रामपंचायतींना केलं आहे. तसंच ज्या ग्रामपंचायती या उपक्रमात सहभागी होतील त्यांनी वृक्षारोपणाची छायाचित्रे आपल्याला पाठवावीत आपण आपल्या फेसबुक पेजवर या ही छायाचित्रे माहितीसह प्रसिद्ध करणार असल्याचंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारं प्रत्येक गाव आणि शिवभक्त या उपक्रमात सहभागी होईल. हा उपक्रम यशस्वी करुन शाश्वत शिवजयंती साजरी करतील असा मला विश्वास आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या