JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शरद पवार अॅक्शन मोडमध्ये, दिल्लीतल्या बैठकीत मोठे निर्णय होणार?

शरद पवार अॅक्शन मोडमध्ये, दिल्लीतल्या बैठकीत मोठे निर्णय होणार?

पक्षावर आपली पकड कायम ठेवण्यासाठी पवारांकडून पावले उचलण्यात येत आहेत. दिल्लीत होणाऱ्या याच वर्किंग कमिटीमध्ये पक्षाच्या घटनेच्या दृष्टीने, संघटनेतल्या बदलांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली :  पक्षातल्या अंतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. महाराष्ट्रात पवार विरुद्ध पवार वाद रंगला आहे. या महानाट्यानंतर दिल्लीत शरद पवारांनी राष्ट्रीय कार्यकारणीची  बैठक बोलावली आहे. यासाठी शरद पवार दिल्लीत दाखल झालेत. पक्षावर आपली पकड कायम ठेवण्यासाठी पवारांकडून पावले उचलण्यात येत आहेत. दिल्लीत होणाऱ्या याच वर्किंग कमिटीमध्ये पक्षाच्या घटनेच्या दृष्टीने, संघटनेतल्या बदलांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. वर्किंग कमिटीच्या बैठकीत कोणाचे बहुमत दिसणार यावरही कायदेशीर लढाईचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय कार्यकारणीत अजित पवारांची बाजू मांडणारे किती पदाधिकारी असतील, याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे. शरद पवारांनी पक्षातील पदाधिकारी, आमदारांसोबत चर्चा सुरू केली आहे. तर, आपल्या दौऱ्याचीही आखणी करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीत होणाऱ्या याच कार्यकारिणी कमिटीमध्ये पक्षाच्या घटनेच्या दृष्टीने, संघटनेतल्या बदलांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहेत. बैठकीत कोणाचे बहुमत दिसणार यावरही कायदेशीर लढाईचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय कार्यकारणीत अजित पवार यांची बाजू मांडणारे किती पदाधिकारी असतील, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी शरद पवार यांची भेट घेणार आहे अशी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. शरद पवार यांच्या पक्ष फुटल्यानंतर राहुल गांधी यांनी फोन केला होता. राहुल गांधी शरद पवार यांची भेट घेऊन सोबत असल्याचा विश्वास देणार आहे. अजित पवार यांच्या बाहेर पडल्यानंतर महाविकास आघाडीच भविष्य काय असणार आहे यावर ही चर्चा होऊ शकते. शरद पवार यांनी याआधीच पक्षविरोधी कारवाया केल्याच्या कारणाने पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल आणि खजिनदार खासदार सुनील तटकरे यांची बडतर्फ केले आहे. त्यामुळे आता गुरुवारी 6 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारणीत नेमकं काय घडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या