JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शरद पवारांना आजही डिस्चार्ज नाही; प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली मोठी अपडेट

शरद पवारांना आजही डिस्चार्ज नाही; प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली मोठी अपडेट

शरद पवार यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी याबाबतची माहिती दिली आहे. शरद पवार यांना पूर्णपणे बरं होण्यास आणखी एक ते दोन दिवस लागण्याची शक्यता आहे

जाहिरात

Sharad Pawar

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 03 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती सोमवारी 31 ऑक्टोबरला समोर आली होती. यानंतर शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 2 किंवा 3 नोव्हेंबरला शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचं समोर आलं होतं. मात्र, आता आजही शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार नसल्याचं समोर आलं आहे. टिकलीवरुन राजकारण! ‘परंपरेच्या बाजारात अक्कल आम्ही विकली..’; सुप्रिया सुळेंचा भिडेंवर निशाणा शरद पवार यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी याबाबतची माहिती दिली आहे. शरद पवार यांना पूर्णपणे बरं होण्यास आणखी एक ते दोन दिवस लागण्याची शक्यता आहे, असं डॉक्टर म्हणाले. त्यांच्यावर सध्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. महिला पत्रकाराला दिलेल्या उत्तरामुळे संभाजी भिडे अडचणीत, महिला आयोगाची नोटीस राष्ट्रवादीने दिली होती माहिती - शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानतर राष्ट्रवादीने ट्विट करत याबाबतच माहिती दिली होती. त्यांनी त्यांनी असे म्हटले होते की, 2 नोव्हेंबरला संध्याकाळी शरद पवार यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. त्यानंतर 3 तारखेला शरद पवार हे शिर्डी येथील नियोजित कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. 4 ते 5 नोव्हेंबर रोजी शिर्डीतील राष्ट्रवादीच्या मेळाव्याला ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलबाहेर गर्दी करू नये, अशी विनंती राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती. मात्र, आता शरद पवार यांना बरं होण्यास आणखी एक-दोन दिवस लागणार असल्याने त्यांचा शिर्डी दौराही रद्द झाला आहे. शरद पवार अजूनही पूर्णपणे बरे झाले नाहीत. त्यामुळे त्यांना आणखी एक -दोन दिवस पूर्णपणे बरं होण्यासाठी लागणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे ते उद्यापासून सुरू होणाऱ्या राष्ट्रवादीच्या शिबिरालाही उपस्थित राहू शकणार नाहीत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या