"Sharad Pawar आमचे नेते होऊच शकत नाही, पाठीत खंजीर खुपसून NCP चा जन्म"
रायगड, 21 सप्टेंबर : शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) या तीन पक्षांनी एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली खरी मात्र, तिन्ही पक्षांत काही आलबेल नसल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. त्यातच आता शिवसेनेचे माजी खासदार अनंत गिते (Shiv Sena former MP Anant Geete) यांनी असं काही वक्तव्य केलं आहे की ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनंत गिते यांनी थेट शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला आहे. नेमकं काय म्हणाले अनंत गिते? रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात राष्ट्रवादीतील काही स्थानिक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमात भाषण करताना अनंत गिते यांनी थेट राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. अनंत गिते यांनी म्हटलं, मला जाणीव आहे की शिवसेनेचा नेता या व्यासपीठावरुन बोलतोय. मी आज कोणतंही राजकीय भाष्य करणार नाहीये. शिवसेना काय आहे आणि शिवसैनिकांची जबाबदारी काय हे सांगत आहे. राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्मयंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस, राष्ट्रवादी आपले नाहीत. आघाडीचं सरकार आहे. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील, तुमची आमची जबाबदारी काय आहे तर गाव सांभाळायचं आहे. आपलं गाव सांभाळायच असताना आम्हाला आघाडीचा विचार करायचा नाहीये… आघाडी आघाडीचं पाहून घेईल. ‘कुण्या राजाची तू गं राणी’ अमोल मिटकरींचा गाण्यातून चंद्रकांत पाटलांना टोला, VIDEO शिवसेना ही काँग्रेसच्या विचाराची कदापी होऊ शकणार नाही या आघाडीत तीन घटक आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा काँग्रेसच आहे. हे एकमेकांचे तोंज पाहत होते का, यांचं एकमेकांचं जमतय का, यांचा विचार एक आहे का? दोन काँग्रेस एक विचाराची होऊ शकत नाही तर शिवसेना ही काँग्रेसच्या विचाराची कदापी होऊ शकणार नाही असंही अनंत गिते म्हणाले. राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून अनंत गिते पुढे म्हणाले, मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. मग त्या दोन काँग्रेस जर एक होऊ शकत नाही तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणं कदापी शक्य नाही. जरी राज्यात आघाडी सरकार असलं तरी आम्ही आघाडी सैनिक नाही आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिकच राहणार. “केंद्रीय जोर लावूनही ठाकरे सरकार पडत नसल्याने विरोधी पक्षाच्या तोंडाला फेस” आमचे गुरू केवळ बाळासाहेब ठाकरे दुसरा कुठलाही नेता त्याला कुणीही किती उपाधी देवो, कुणी जाणता राजा म्हणो.. कुणी आणखी काय म्हणो… पण आणचे गुरू तो होऊ शकत नाही. आमचे गुरू केवळ बाळासाहेब ठाकरे आहेत. ही आघाडी केवळ सत्तेची तडजोड आहे. ज्या दिवशी तुटेल त्या दिवशी तुम्ही आपल्याच घरी येणार. आपलं घर भक्कम करण्यासाठी आपल्याला ताकद वाढवायची आहे असंही अनंत गिते म्हणाले. संजय राऊतांची प्रतिक्रिया अनंत गिते यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी म्हटलं, मला विषय माहित नाही, पवार साहेब आणि ठाकरे राज्याचे नेते आहेत. गितेंच्या वक्तव्याशी सरकारचा काहीही संबंध नाही. सरकार उद्धव ठाकरे चालवताहेत. सर्वांनीच ठाकरेंचे नेतृत्व स्वीकारले आहे