JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अमरावतीतील कथित लव्ह जिहाद प्रकरणाला धक्कादायक वळण; तरुणीचा नवनीत राणांवर गंभीर आरोप

अमरावतीतील कथित लव्ह जिहाद प्रकरणाला धक्कादायक वळण; तरुणीचा नवनीत राणांवर गंभीर आरोप

पहाटे साडेतीन वाजता तरूणीला अमरावती पोलीस साताऱ्यावरून अमरावतीला घेऊन आले. पहाटे चार वाजता अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तरुणीचा जबाब नोंदवला.

जाहिरात

नवनीत राणा

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती 09 सप्टेंबर : अमरावती येथे कथित लव्ह जिहाद प्रकरणी बेपत्ता असलेल्या तरूणीचा शोध लागला आहे. बेपत्ता झालेली ही तरुणी अखेर चार दिवसांनंतर अमरावतीत पोहोचली. संबंधित युवतीला डांबून ठेवल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्याचबरोबर त्यांनी अमरावती येथील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोंधळ घातला होता. मात्र, या तरुणीच्या आरोपांनंतर आता प्रकरणाला वेगळंच वळण आलं आहे. हिंगोलीत अंधश्रद्धेचा कळस! सहा महिन्यांच्या ‘त्या’ बालिकेच्या दर्शनासाठी हजारो लोक जमले पहाटे साडेतीन वाजता तरूणीला अमरावती पोलीस साताऱ्यावरून अमरावतीला घेऊन आले. पहाटे चार वाजता अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तरुणीचा जबाब नोंदवला. यावेळी तिने म्हटलं, की मी स्वतःहून रागाच्या भरात घरातून निघून गेले होते. खासदार नवनीत राणा यांनी माझी बदनामी केली असल्याचा गंभीर आरोपही या तरुणीने यावेळी केला. पहाटे तरुणीचा जबाब घेऊन घेऊन तिला आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आलं. खासदार नवनीत राणा आणि भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी याप्रकरणात लव्ह जिहादचा आरोप केला होता. ‘महिलांना कोणी नाकारु शकत नाही’, चित्रा वाघ मंत्री होणार? अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील रुग्णवाहिकेवर चालक असणाऱ्या एका मुस्लीम व्यक्तीने सुशिक्षित हिंदू तरुणीशी लग्न केल्याचा प्रकार खासदार अनिल बोंडे यांनी उघडकीस आणला होता. मुस्लीम युवकाने तरुणीला विश्वासात घेत अमरावती येथील चंद्रविला या ट्रस्टकडून अवैधरित्या लग्न लावून घेतल्याची माहिती समोर आलेली. या विवाहसंस्थाला परवानगी नसताना या विवाह संस्थेने बनावट लग्न प्रमाणपत्र दिल्याचा आरोप होता. या प्रकरणात नवनीत राणा यांनी उडी घेतली होती. हिंदू तरुणींशी लग्न करून त्यांचं धर्मांतरण केलं जातं आणि त्यांच्यावर शारीरिक तसंच मानसिक अत्याचार केला जात असल्याचा आरोप राणा यांनी केलेला. या प्रकरणी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये बराच गोंधळही घातला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या