JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Satara News : आई-वडिल आणि 2 मुलांसह आई-वडिलांचा घरात आढळला मृतदेह, सातारा हादरलं

Satara News : आई-वडिल आणि 2 मुलांसह आई-वडिलांचा घरात आढळला मृतदेह, सातारा हादरलं

Satara News : एकाच घरात आढळले 4 जणांचे मृतदेह, सातारा हादरलं

जाहिरात

साताऱ्यात एकाच घरात आढळले चार मृतदेह

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सचिन जाधव,प्रतिनिधी सातारा, 21 जुलै : पश्चिम महाराष्ट्र हादरला आहे. एका घरात चार मृतदेह आढळले आहेत. त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत सध्या तपास सुरू आहे. साताऱ्यातील पाटण तालुक्यातील संनबुर इथे ही घटना समोर आली आहे. एकाच घरात चारही मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर पोलीस आजूबाजूला चौकशी करत आहे. मृत हे एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळाली आहे. आई वडील आणि त्यांचं दोन मुलं घरात मृत अवस्थेत आढळून आली.

ही सामूहिक आत्महत्या आहे की घातपात आहे याबाबत पोलीस तपास करत आहे. घरातून बाहेर कोणी येत नसल्यामुळे ग्रामस्थांच्या ही घटना लक्षात आली. आनंदा जाधव वय 65,  पत्नी सुनंदा जाधव 60, मुलगा संतोष आनंद जाधव 35,  त्यांची मुलगी पुष्पलता दस 45 अशी मृत व्यक्तींची नावं आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या