JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / UPSC ची मुलाखत 10 दिवसांवर अन् वडिलांचं छत्र हरपलं, तरीही डगमगला नाही सातारचा तरुण!

UPSC ची मुलाखत 10 दिवसांवर अन् वडिलांचं छत्र हरपलं, तरीही डगमगला नाही सातारचा तरुण!

युपीएससीच्या मुलाखतीला दहा दिवस बाकी असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 डिसेंबर : महाराष्ट्राला प्रशासकीय अधिकाऱ्यांची फार मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील, मराठी मातीत जन्माला आलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर परराज्यातच नव्हे तर देशात आपल्या राज्याचे नाव मोठे केले आहे. त्यामुळे तरुण मराठी अधिकाऱ्यांच्या जीवनाचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या अनुभवाचा मराठी तरुणाईला प्रेरणा मिळावी, या हेतूने न्यूज 18 लोकमत अशा अधिकरांच्या संघर्षाचा आढावा घेत असते. यात आज मराठी मातीत जन्माला आलेले पण मात्र, आसाम राज्यात सेवा बजावत असलेले आयएएस अधिकारी नितीन खाडे यांच्या प्रवासाबाबत जाणून घेऊयात. असा राहिलाय आयएएस अधिकारी नितीन खाडेंचा प्रवास - नितीन खाडे हे सातारा जिल्ह्यातील आहेत. सध्या ते आसाम राज्यात मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कोरोना काळात आसाम विधानसभा निवडणुकीचे यशस्वी नियोजन केल्याबद्दल त्यांना सरकारच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे वडील सहकारी साखर उद्योगात होते. त्यांच्या वडिलांच्या कामामुळे, त्यांनी चार वेगवेगळ्या शाळांमधून शिक्षण घेतले. शेवटी, त्यांचे वडील महाराष्ट्रातील पंढरपूर येथे स्थायिक झाले. याठिकाणी श्री विठ्ठल प्रशाला या नावाने प्रसिद्ध असलेल्या शाळेतून त्यांनी त्यांचे मॅट्रिक पूर्ण केले. मग तिथून ते पुण्याला गेले. यानंतर तिथे त्यांनी विज्ञान शाखेत बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी पाच वर्षांचा लॉ कोर्स केला आणि इथेच लॉ कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी सुरू केली. तीन वर्ष अभ्यास केल्यानंतर त्यांनी यूपीएससीची परिक्षा पास केली. आयएएस अधिकारी नितीन खाडे स्पर्धा परिक्षेची तयारी मुंबई शहरातून सुरू केली. सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास केला. हा खूप प्रेरणादायी प्रवास होते, असे ते सांगतात. सुरुवातीला त्यांनी राज्य सरकारच्या संस्थेत तयारीला सुरुवात केली. त्यांना संस्थेत पहिल्या वर्षाला प्रवेश मिळाला होता. मात्र, त्यावेळी ते युपीएससी प्रिलिम्स उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना संस्था सोडावी लागली. वडिलांचा निधन अन् मुलाखतीचा तो प्रसंग - दरम्यान, CSE मुख्य परीक्षेला अॅपिअर झाल्यानंतर ते पुण्याला गेले. मात्र, यादरम्यान, त्यांच्या आयुष्यात एक मोठी दुर्घटना घडली. युपीएससीच्या मुलाखतीला दहा दिवस बाकी असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. याबाबत ते सांगतात की, माझ्या वडिलांचा अपघात झाला होता आणि मी त्यांच्यासोबत दोन महिने आयसीयूमध्ये घालवले होते. CSE मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर इथेच त्यांना मुलाखतीचा कॉल आला. हेही वाचा -  साताऱ्याच्या पठ्ठ्यानं मैदानंच जिंकलं, आधी IPS अन् नंतर झाला IAS या काळात त्यांच्या वडिलांची प्रकृतीही सुधारली होती आणि म्हणूनच ते या काळात दिल्लीला रवाना झाले. मात्र, दुर्दैवाने घरी परतल्यावर त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांच्या वडिलांचे निधन झाले. मुलाखतीची तयारी करण्यासाठी त्यांच्या हातात 10 दिवस उरले होते. त्या संकटातही त्यांनी मुलाखतीची तयारी सुरू ठेवली आणि युपीएससीची परिक्षा पास करत यशाला गवसणी घातली. 6 एप्रिल रोजी त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि 7 मे रोजी नितीन खाडे यांची यूपीएसीमध्ये निवड झाली. आयएएससाठी माझी निवड होण्यामागे वडिलाचा आशीर्वाद आहे, असे ते सांगतात. युपीएससी उत्तीर्ण केल्यानंतर नितीन खाडे यांना आयएएसच्या आसाम-मेघालय कॅडर मिळाले. त्यांना सुरुवातीला आसाममधील माजुली या रमणीय ठिकाणी पोस्टिंग मिळाले होते. हेही वाचा -  Life@25 : खान्देशचे सुपूत्र IAS अधिकारी मनोज महाजन ओडिशात बजावताएत सेवा, तरुणाईला देतात ‘हा’ सल्ला परिवारासोबतचा वेळ अशाप्रकारे घालवता - मी माझ्या कामाचा आनंद घेतो आणि जर तुम्ही कामाचा आनंद घेत असाल तर तुम्हाला तणाव जाणवत नाही. मला माझ्या मुलांसोबत माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडते. मी कधीकधी त्यांना सामाजिक शास्त्र, नागरिकशास्त्र, इतिहास आणि कायद्याशी संबंधित विषय शिकवतो, त्यामुळे मजा येते. आमच्या काळाच्या तुलनेत, त्यांच्याकडे खूप जास्त एक्सपोजर आहे आणि ते खूप उत्सुक आहेत आणि ते मनोरंजक प्रश्न विचारतात. मला त्यांच्यासोबत चॅटिंग करणे, संगीत ऐकणे आणि त्यांच्यासोबत चित्रपट किंवा खेळ पाहणे आवडते. मी त्यांच्यासोबत क्रिकेट, टेनिस आणि फुटबॉलही खेळतो, कारण त्यांच्यासोबत खेळल्याने मला आनंद होतो. तरुणाईला मोलाचा सल्ला - तुम्ही जे करता त्याचा आनंद घ्यावा. जर तुम्ही तुमच्या अभ्यासाचा आनंद घेऊ लागलात, तर तुम्हाला ते करण्याचं ओझं वाटणार नाही. त्यामुळे तुम्ही जे काही कराल, तेच करण्यात तुम्हाला आनंद वाटत असेल तर ते खूप सोपे होईल. परिणामी, तुम्ही आनंदी आणि समाधानी व्हाल. त्यामुळे तुमचे हृदय आणि आत्मा त्यात घाला. तुम्ही जे काही चांगले काम करता त्यात तुमचे सर्वोत्तम द्या. ऑनलाइन उपक्रम आणि शिकण्यासोबतच मुलांनी वाचन, खेळ खेळले पाहिजे आणि छंद जोपासले पाहिजेत. यामुळे त्यांचे त्यांचे मन आणि शरीर निरोगी राहिल. नागरी सेवांसाठी तयारी करणे हा एक मोठा पल्ला आहे. त्यांच्या प्रवासात अनेक टप्पे आणि चढ-उतार आले. परंतु नंतर पुन्हा योग्य मार्गदर्शनाने आणि जर एखाद्याने मनापासून तयारी केली तर, नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्याची अधिक शक्यता असते, असे ते सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या