JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'आपले साहेब मुख्यमंत्री होणार' सेनेच्या नेत्याने उदयनराजेंना मारली मिठी, VIDEO

'आपले साहेब मुख्यमंत्री होणार' सेनेच्या नेत्याने उदयनराजेंना मारली मिठी, VIDEO

सध्या अडचणीत असलेले उद्धव ठाकरे सरकार जाणार आणि भाजपचे सरकार येणार असंच काही…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सातारा, 21 मार्च : मुंबईत स्फोटकांनी कार सापडल्या प्रकरणी मुंबईचे (Mumbai Police) माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. विरोधकांच्या हाती आयते कोलीत लागले आहे. तर दुसरीकडे, शिवसेनेचे नेते नरेंद्र पाटील (Narndra Patil) यांनी ‘आपले साहेब आता मुख्यमंत्री होतील’ खासदार उदयनराजे भोसले (UdayanRaje Bhosle) यांना महामार्गावर गळाभेट घेतली आहे. शिवसेना नेते नरेंद्र पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची महामार्गावर गळाभेट घेतल्याचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाल आहे. या व्हिडीओ मध्ये नरेंद्र पाटील आणि उदयनराजे भोसले हे दोघेही महामार्गवर अचानक गाडी थांबवतात आणि एकमेकांची गळा भेट घेताना दिसत आहेत. पण यावेळी सातारा खासदारकीची निवडणूक लढण्यासाठी शिवबंधन बांधलेले नरेंद्र पाटील हे ‘आपले साहेब मुख्यमंत्री होणार’ म्हणजेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असं बोलून ही गळाभेट घेतल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सध्या अडचणीत असलेले उद्धव ठाकरे सरकार जाणार आणि भाजपचे सरकार येणार असंच काहीसे या सध्यातरी शिवसेनेत असलेल्या नरेंद्र पाटील यांना सुचवायचे असेल असंच या व्हिडिओ वरून स्पष्ट होते आहे. उदयनराजे यांनीही नरेंद्र पाटील यांची गळाभेट घेऊन आनंद व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर नरेंद्र पाटील यांनी निवडणूक उदयनराजे भोसले यांच्याविरोधातच लढवली होती. यावेळी उदयनराजे यांनी नरेंद्र पाटलांचा पराभव केला होता. परंतु, अलीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून नरेंद्र पाटील आणि उदयनराजे भोसले यांच्या जवळीक वाढली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली होती. यावेळी मराठा आरक्षण प्रश्नावरील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली केली. त्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यक्रमालाही उदयनराजे यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर आज दोन्ही नेत्यांचा हा व्हिडीओ समोर आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या